ओमिक्रॉनबाबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची संसदेत माहिती, म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fine to people who are following corona rules

ओमिक्रॉनबाबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची संसदेत माहिती, म्हणाले...

नवी दिल्ली : कोरोनामुळे देशात उद्भवलेल्या दोन लाटांचा सामाना केल्यानंतर केंद्र सरकार ओमिक्रॉन व्हेरिएंटला (Omicron Variant) तोंड देण्यासाठी सज्ज आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Union Health Minister Mansukh Mandaviya) यांनी आज संसदेत दिली. यावेळी त्यांनी भविष्यातील परिस्थितीला तोंड देण्यासाठी केंद्रातर्फे करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे 88 टक्के नागरिकांना लसीचा पहिला तर 58 टक्के ज्येष्ठ नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. देशातील बहुतांश लोकांना लसीचे डोस देण्यात आल्याचे मांडविया यांनी सांगितले.

मांडविया म्हणाले की, देशात आतपर्यंत 161 ओमिक्रॉनची (India has 161 Omicron cases) लागण झालेल्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. भारतातील 12 राज्यांमध्ये ओमिक्रॉनचा शिरकाव झाला असून सर्वाधिक 54 रूग्ण एकट्या महाराष्ट्रातील आहे. (Omicron Cases In Maharashtra) ओमिक्रॉनमुळे उद्भविणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी ऑक्सिजन आणि औषधांचा बफर स्टॉक तयार ठेवण्यात आला आहे. याशिवाय, विविध राज्यांमध्ये 48 हजार व्हेंटिलेटर बसविण्यात आले आहेत. त्याशिवाय परिस्थितीवर मात करण्याच्या दृष्टीने राज्यांना विशेष पॅकेज देण्यात येत आहे.

Web Title: India Government Ready To Face Any Situation Due To Omicron Said Union Health Minister Mansukh Mandaviya In Parliament

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..