esakal | भारत बायोटेकला विश्वास; जुलै-सप्टेंबरपर्यंत मिळेल जागतिक मान्यता
sakal

बोलून बातमी शोधा

भारत बायोटेकला विश्वास; जुलै-सप्टेंबरपर्यंत मिळेल जागतिक मान्यता

कोव्हॅक्सिन लशीची निर्माता कंपनी भारत बायोटेक फार्माकडून लशीच्या जागतिक मंजुरीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

भारत बायोटेकला विश्वास; जुलै-सप्टेंबरपर्यंत मिळेल जागतिक मान्यता

sakal_logo
By
विनायक होगाडे

न्यूयॉर्क : कोव्हॅक्सिन लशीची निर्माता कंपनी भारत बायोटेक फार्माकडून लशीच्या जागतिक मंजुरीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. जवळपास 60 हून अधिक देशांमध्ये मंजूरीसाठी कोव्हॅक्सिनचे प्रयत्न सुरु आहेत. तर जवळपास 13 देशांमध्ये आपत्कालीन वापरासाठीच्या मंजूरीसाठी प्रयत्न सुरु आहेत. यासाठीचा अर्ज जिनिव्हा येथील जागतिक आरोग्य संघटनेकडे सुपुर्द करण्यात आला आहे. याबाबतची मंजूरी जुलै ते सप्टेंबर महिन्यापर्यंत मिळण्याची शक्यता आहे. (BharatBiotech says Application for Emergency Use Listing submitted to WHO Geneva regulatory approvals are expected Jul Sept 2021 )

हेही वाचा: 'Covaxin'च्या जागतीक मान्यतेसाठी धडपड; WHOला कागदपत्रं सुपूर्द

तर दुसरीकडे आपत्कालीन वापरासाठीच्या लशींच्या यादीत समावेश होण्यासाठी अर्ज केलेल्या भारत बायोटेक कंपनीकडून आणखी माहिती मिळणे आवश्‍यक आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने आज सांगितले. लशीबाबत निर्णय घेण्यासाठीची बैठक या किंवा पुढील महिन्यात होणे अपेक्षित आहे.

हैदराबादस्थित भारत बायोटेकने त्यांनी विकसित केलेल्या ‘कोव्हॅक्सिन’ लशीचा आपत्कालीन वापरासाठीच्या यादीत समावेश करण्यासाठी १९ एप्रिलला अर्ज केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे निकष कोव्हॅक्सिन लशीने पूर्ण केल्यास या लशीचा जगभरात वापर होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. लस उत्पादकांनी सादर केलेल्या माहितीच्या दर्जावर आणि किती प्रमाणात निकष पूर्ण होतात, यावर लशीचा यादीत समावेश होण्याच्या प्रक्रियेला किती वेळ लागेल, ते अवलंबून असते. भारत बायोटेक कंपनीने आरोग्य संघटनेकडे ९० टक्के कागदपत्रे सादर केली असून पुढील महिन्यात उर्वरित कागदपत्रे पुरविली जाणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले. या यादीत कोव्हॅक्सिनचा समावेश होण्याबाबत भारत बायोटेक आशावादी आहे. कोव्हॅक्सिनला ११ देशांमध्ये मंजुरी मिळाली आहे. तसेच, तंत्रज्ञान हस्तांतरासाठी सात देशांमधील ११ कंपन्यांनी उत्सुकता दाखविली असल्याचेही सूत्रांनी सांगितले. अमेरिकेतही या लशीला मान्यता मिळण्यासाठी बोलणी सुरु आहे.