esakal | लहान मुलांसाठी कोव्हॅक्सिनच्या मंजुरीची शक्यता; भारत बायोटेकने DGCIकडे दिला डेटा
sakal

बोलून बातमी शोधा

Covaxin

भारत बायोटेकने कोव्हॅक्सिनच्या लहान मुलांवरील चाचणीचा डेटा डीसीजीआय़कडे पाठवला आहे.

कोव्हॅक्सिनच्या लहान मुलांवरील चाचणीचा डेटा सोपवला DGCI कडे

sakal_logo
By
टीम ई सकाळ

भारत बायोटेकने कोव्हॅक्सिनच्या लहान मुलांवरील चाचणीचा डेटा डीसीजीआय़कडे पाठवला आहे. याची माहिती कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर कृष्णा एला यांनी दिली. शनिवारी भारत बायोटेकने डीसीजीआयकडे २-१८ वर्षांच्या मुलांवरील चाचणीचा डेटा पाठवला आहे.

भारत बायोटेकने सप्टेंबरमध्ये १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांवर चाचणी घेतली होती. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण झाल्यानतंर डेटा डीजीसीआयकडे सोपवला आहे. लवकरच भारत बायोटेकच्या लशीच्या लहान मुलांवरील वापराला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: बंगळूरू : डिलीव्हरी बॉयद्वारे दारू, गांजा व्हायचा घरपोहच, NCB कडून भांडाफोड

कोरोना लशींच्या आपत्कालीन वापरासाठी मूल्यांकनाबाबत जागतिक आरोग्य संघटनेच्या गाइडलाइनवरून असं समजतं की, भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीला अंतिम मंजुरी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत मिळेल. शनिवारी डॉक्टर कृष्णा एला यांनी सांगितलं की, कंपनीने सर्व डेटा जागतिक आरोग्य संघटनेकडे सोपवला आहे. भारत बायोटेकला त्यांच्या इतर लशींसाठी मंजुरी मिळाली आहे. आता कोव्हॅक्सिनला कधी मंजुरी मिळेल याबाबत मात्र काही सांगितलेलं नाही.

भारत बायोटेकने ९ जुलैपर्यंत जागतिक आरोग्य संघटनेकडे आवश्यक ती कागदपत्रे जमा केली होती. जागतिक आरोग्य संघटनेच्या समीक्षेला जवळपास सहा आठवडे लागतात. जुलैच्या शेवटी ही प्रक्रिया सुरु झाली होती.

loading image
go to top