Bharat Jodo Yatra : सोनिया, प्रियांका गांधी ‘भारत जोडो’त सहभागी होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bharat Jodo Yatra

Bharat Jodo Yatra : सोनिया, प्रियांका गांधी ‘भारत जोडो’त सहभागी होणार

बंगळूर : अखिल भारतीय काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांचे सोमवारी म्हैसूर विमानतळावर आगमन झाले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो पदयात्रे’त त्या गुरुवारी सामील होणार आहेत. दरम्यान, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधीही शुक्रवारी (ता. ७) कर्नाटकात येत असून त्याही पदयात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली.
कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, एआयसीसी सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि रणदीप सिंग सुरजेवाला आणि पक्षाच्या इतर नेत्यांनी म्हैसूरच्या विमानतळावर सोनिया गांधींचे स्वागत केले.

दरम्यान, म्हैसूरहून निघालेल्या ‘भारत जोडो यात्रे’ला सोमवारी दुपारी श्रीरंगपट्टण येथे ४ आणि ५ ऑक्टोबरला दोन दिवस विश्रांती दिली आहे. सोनिया गांधी दोन दिवस कोडगू येथे वास्तव्य करतील. सोनिया गांधी गुरुवारी मंड्या जिल्ह्यातील पांडवपूर येथे भारत जोडो यात्रेत सामील होतील. प्रियांका गांधी सात ऑक्टोबर रोजी राज्यात येणार असून नागमंगल येथील यात्रेत सहभागी होतील.