
Bharat Jodo Yatra : ''जो राहुल गांधी तुमच्या डोक्यात आहे, त्याला मी मारलं'' अजब विधानाने गोंधळ
नवी दिल्लीः राहुल गांधींची भारत जोडो यात्रा हरियाणामध्ये आहे. काँग्रेसची ही यात्रा म्हणजे राहुल गांधींची इमेज बनवण्यासाठी असल्याचा आरोप नेहमी केला जातो. त्याला आज राहुल गांधींनी त्यांच्याच स्टाईलमध्ये उत्तर दिलं.
भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांना इमेज बदलण्याचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राहुल म्हणाले की, मी असल्या भानगडीत पडत नाही. यात्रेमुळे त्यांची प्रतिमा किती बदलली? या प्रश्नावर त्यांनी नेमकेपणाने उत्तर दिलं.
राहुल गांधी म्हणाले की, राहुल गांधी जो तुमच्या डोक्यात आहे, त्याला मी मारलं आहे. तो माझ्या डोक्यात नाहीये, तो निघून गेला. तुम्ही ज्या माणसाला बघताय, तो राहुल गांधी नाही. फक्त आपल्याला तसं वाटतंय.
हेही वाचाः प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....
''तुम्हाला विश्वास नसेल तर हिंदू धर्म वाचा. शिवजींना वाचा. राहुल गांधी तर तुमच्या आणि भाजपच्या डोक्यात आहे..परंतु माझ्या डोक्यात नाही.''
हेही वाचा: Mulshi Pattern 2 : आ रा राssss राsss खतरनाक! मुळशी पॅटर्नचा दुसरा भाग येतोय
मला 'इमेज'ची पर्वा नाही- राहुल गांधी
मला माझ्या इमेजची पर्वा नाहीये. तुम्ही जी माझी इमेज बनवणार आहात, तशी बनवा. मला याचा काहीही फरक पडत नाही. मला फक्त माझं काम करायचं आहे. शिवाय माझी प्रतिमा किती बदलली आणि किती नाही, हे तर तुम्हालाच ठरवायचं आहे, असंही राहुल गांधी शेवटी म्हणाले.