Bheem Army: हल्ल्यानंतर जखमी अवस्थेत आझाद यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मला संशय…”

भीम आर्मी या संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यावर उत्तर प्रदेशातल्या सहारनपूर येथे जीवघेणा हल्ला झाला
Bheem Army
Bheem ArmyEsakal
Updated on

भीम आर्मी संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यावर उत्तर प्रदेशातल्या सहारनपूर येथे काही अज्ञात लोकांनी जीवघेणा हल्ला केला. ते कारने देवबंदला जात असताना काही अज्ञातांनी त्यांच्या कारवर गोळीबार केला. यात चंद्रशेखर आझाद जखमी झाले. यानंतर जखमी अवस्थेतच चंद्रशेखर आझाद यांनी या हल्ल्यावर त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी हल्ल्याबाबतची माहिती दिली आहे. (Latest Marathi News)

चंद्रशेखर आझाद यांनी सांगितले कि, “मला आठवत नाही. मात्र, माझ्याबरोबर असणाऱ्या लोकांनी हल्लेखोरांना ओळखलं आहे. हल्लेखोरांची गाडी सहारनपूरच्या दिशेने गेली. आमच्या गाडीत एकूण पाच लोक होते. गोळीबार झाल्यावर आम्ही यू टर्न घेतला. त्यानंतर काय घडलं त्याची मला माहिती नाही.”(Latest Marathi News)

Bheem Army
Bheem Army : भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांच्यावर जीवघेणा हल्ला! गोळीबारात जखमी

“आमच्याबरोबर असणारे आमचे सहकारी डॉ. महिपाल यांनाही कदाचित गोळी लागली आहे. मला नक्की काय घडलं आठवत नाही, मात्र त्यांच्या हातातून रक्त येत होतं. त्यांना कदाचित गोळी लागली आहे. जेव्हा गोळीबार झाला तेव्हा मी घाबरलो होतो. त्यामुळे मला नक्की काय घडलं ते आठवत नाही,” असं चंद्रशेखर आझाद यांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे.(Latest Marathi News)

Bheem Army
राज्यरंग : उत्तर प्रदेश : योगी-मोदी सत्तेला आव्हान

गोळीबार झाल्यावर मी सहारनपूरच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला फोन केला. तसेच माझ्यावर गोळीबार झाल्याची त्यांना माहिती दिली. मला वेदना होत आहेत. त्यामुळे मला गोळी लागली असावी, असंही त्यांना सांगितल्याची माहिती आझाद यांनी दिली. तर हल्ल्यानंतर कुणावर काही संशय आहे का असं विचारल्यानंतर चंद्रशेखर आझाद म्हणाले की, माझं कुणाशीही काही भांडण नाही. त्यामुळे मला कोणावरही संशय नाही.(Latest Marathi News)

Bheem Army
Chhattisgarh: छत्तीसगडमध्ये काँग्रेसची मोठी खेळी; टीएस सिंह देव यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com