Chhattisgarh: छत्तीसगडमध्ये काँग्रेसची मोठी खेळी; टीएस सिंह देव यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती

छत्तीसगड काँग्रेसमधील वाद मिटवण्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसनं ही खेळी केली आहे.
Chhattisgarh
Chhattisgarh
Updated on

रायपूर : छत्तीसगडमध्ये या वर्षाच्या शेवटी विधानसभा निवडणुका होणार आहेत. यापार्श्वभूमीवर काँग्रेसनं मोठा निर्णय घेत टी. एस. सिंह देव यांची उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. छत्तीसगडच्या निवडणुकीबाबत दिल्लीमध्ये काँग्रेस हायकमांडची बुधवारी बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. (Big move of Congress in Chhattisgarh TS Singh Dev appointed as Deputy Chief Minister)

टीएस सिंह देव हे छत्तीसगडचं मोठं राजकीय प्रस्थ आहे. त्यांच्याकडं सध्याच्या मंत्रीमंडळात आरोग्य मंत्रीपदाचा कारभार सोपवण्यात आला आहे. पण आता त्यांच्या खांद्यावर उपमुख्यमंत्रीपदाची देखील जबाबदारी देण्यात आली आहे. देव यांना नवी जबाबदारी मिळाल्यानं मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी देव यांचं अभिनंदन केलं आहे.

छत्तीसगडमध्ये CM बघेल यांना 'काका' तर DCM देव यांना 'बाबा' म्हणून ओळखलं जातं. त्यामुळं आता हे काका-बाबा येत्या निवडणुकीत काय कमाल करतात याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. कारण छत्तीसगड काँग्रेसमधील वाद सोडवण्याच्या दिशेनं काँग्रेसनं हे महत्वाचं पाऊल टाकलं आहे. (Latest Marathi News)

सन २०१८च्या विधानसभा निवडणुकीत भूपेश बघेल आणि टीएस सिंह देव या जोडीनं काँग्रेसला सत्ता मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली होती. देव यांना नवी जबाबदारी दिल्यानंतर मुख्यमंत्री बघेल यांनी ट्विट केल. यामध्ये ते म्हणतात, "आम्ही तयार आहोत. महाराज साहेबांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि शुभेच्छा" (Marathi Tajya Batmya)

Chhattisgarh
Mumbai Crime: शेजाऱ्यांच्या अंत्यसंस्काराला गेले नाहीत म्हणून धारदार शस्त्रानं हल्ला! मुलीचा मृत्यू, आई गंभीर

दरम्यान, काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपल यांनी ट्विट करत म्हटलं की, "काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी टीएस सिंह देव यांना छत्तीसगडच्या उपमुख्यमंत्रीपदी नियुक्तीसाठी मंजुरी दिली आहे. ते एक प्रामाणिक नेते आणि सक्षम प्रशासक आहेत.

उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर त्यांच्या कामाचा जनतेला चांगला फायदा होईल. आम्हाला विश्वास आहे की, छत्तीसगडची जनता मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला प्रचंड बहुमतानं पुन्हा एकदा निवडून देईल"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com