वरिष्ठांच्या अश्लिल कमेंटसला कंटाळून आत्महत्या

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

हैदराबाद : सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी भारत हेवी इलेक्ट्रिक्स लिमिटेड (BHEL)या कंपनीतील एका महिला अकाऊंटटने वरिष्ठांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यासह अन्य सहकाऱ्यांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून हे पाऊल उचलले आहे, असे आत्महत्याकरण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये म्हटले आहे.

हैदराबाद : सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी भारत हेवी इलेक्ट्रिक्स लिमिटेड (BHEL)या कंपनीतील एका महिला अकाऊंटटने वरिष्ठांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यासह अन्य सहकाऱ्यांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून हे पाऊल उचलले आहे, असे आत्महत्याकरण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये म्हटले आहे.

महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने कंपनीमध्ये आणि परिसरात खळबळ उडाली आहे. महिलेच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नेहा चौकसे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. नेहा यांचे भोपाळमध्ये वास्तव्य होते. हैदराबाद येथील BHEL कंपनीमध्ये त्या डिप्युटी ऑफिसर म्हणून अकाऊंटटमध्ये कार्यरत होत्या. नेहा यांच्या पतीने तक्रार दाखल केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिस अधिकारी व्यंकटेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहा यांनी गुरुवारी (ता. 17) सकाळी 10.30च्या सुमारास स्वत:ला खोलीत कोंडून घेतले. पत्नी बाहेर न आल्यामुळे पतीने दार वाजवण्यास सुरुवात केली. मात्र, खोलीमधून कोणताही प्रतिसाद न आल्याने त्यांनी दरवाजा तोडला. यावेळी नेहा यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. नेहाजवळ सुसाईड नोट मिळाली. त्यामध्ये BHEL कंपनीतील वरिष्ठ अधिकारी आणि सहकारी छळ करतात आणि आत्महत्येसाठी त्यांनीच प्रवृत्त केल्याचे चिठ्ठीमध्ये म्हटले आहे.

नेहा यांनी आत्महत्येपूर्वी लिहीलेल्या चिठ्ठीमध्ये म्हटले आहे की, 'माझा फोन हॅक केला जात असून, वरिष्ठ अधिकारी गुप्त माहिती मिळवत होते. शिवाय, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अश्लील शब्द वापरल्याचेही म्हटले आहे. वरिष्ठ अधिकारी आर्थर किशोर कुमार हे दोन महिन्यांपासून त्रास देत होते. त्यांच्यासोबत मोहनलाल सोनी, तीरथभासी स्वेन, सीताराम पेंटाकोटा व महेश कुमार नावाच्या सहकाऱ्यांनी अश्लील शब्दात कमेंट्स केल्या होत्या.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BHEL woman employee commits suicide accuses colleagues of harassment at hyderabad