‘या’ गवतावर पाय ठेवताच जाते स्मरणशक्ती, Chhattisgarh मधली चमत्कारिक वनस्पती

भारतातील छत्तीसगढमध्ये एक अशी वनस्पती आहे. जिच्या संपर्कात आल्याने काही काळासाठी स्मरणशक्ती जाते
छत्तीसगढ मधली चमत्कारिक वनस्पती
छत्तीसगढ मधली चमत्कारिक वनस्पतीEsakal

साधारणत: एखादा मोठा अपघात झाला किंवा डोक्याला मार लागल्यावर स्मरणशक्ती गेल्याचं तुम्ही ऐकलं असेल. अनेकदा मेंदूला कोणत्याही कारणाने इजा झाल्यास स्मरणशक्ती जाण्याची शक्यता असते. मात्र जर कुणी तुम्हाला सांगितलं की एखाद्या वनस्पतीवर पाय ठेवल्यास स्मरणशक्ती Memory जाऊ शकते तर तुमचा विश्वास बसेल का? Bhoolan Ghas strange flora in chhattisgarh which takes away your memory

यावर तुमचा विश्वास बसत नसला तरी हे सत्य आहे. या जगात एक अशी वनस्पती Flora आहे जिच्यावर जर तुमचा पाय पडला तर जवळपास २-३ तासांसाठी तुमची स्मरणशक्ती Memory जाते तुम्हाला काही लक्षात राहत नाही. 

या पृथ्वीवर अनेक चमत्कारिक गुणधर्म असलेल्या वनस्पती आहेत. यातील काही वनस्पतींचा आयुर्वेदात औषधांसाठी वापर केला जातो. काही वनस्पती या किडे किटकं खातात. मात्र भारतातील छत्तीसगढमध्ये एक अशी वनस्पती आहे. जिच्या संपर्कात आल्याने काही काळासाठी स्मरणशक्ती जाते.ही एक वेलवर्गिय वनस्पती असून या वनस्पतीला भूलन घास किंवा भूलन जडी असं म्हंटलं जातं. 

कुठे आढळते भूलन घास

मध्यप्रदेश आणि छत्तीसगढच्या सीमाभागात ही वनस्पती आढळत असल्याचं म्हंटलं जातं. सध्या ही वनस्पती छत्तीसगढमधील राजनांदगाव या नावाच्या परिसरात आढळते. मात्र काळानुसार या वनस्पतीकडे दुर्लक्ष झाल्याने तिचं प्रमाण कमी होत चाललं आहे. तसचं मध्य प्रदेशमधील अमरकंटक इथं देखील काही प्रमाणात भूलन घास अस्तित्वात आहे. 

हे देखिल पहा-

छत्तीसगढ मधली चमत्कारिक वनस्पती
Memory loss : आता विसरभोळेपणाला करा रामराम; हे पदार्थ खा

खजिन्याच्या रक्षणासाठी राजाने भूलन जडीचा बगिचा तयार केला

असं म्हंटलं जातं की राजनांदगावचे राजा सर्वेश्वर दास आणि त्यांचा मुलगा दिग्विजय यांनी त्यांच्या शासन काळामध्ये राज महालातील बगिच्यामध्ये भूलन घास किंवा भूलन बुटीची लागवड केली होती. भूलन घास लावण्यामागचं कारणं काय होतं यामागची कुठेही नोंद नसली तरी राजाने महालातील खजिना सुरक्षित रहावा यासाठी काही ठराविक भागात ही वनस्पती लावली होती  असं म्हटलं जातं. 

चोरी करण्यासाठी आलेले चोर या गवतामुळे स्मरणशक्ती विसरतील आणि चोरीचा धोका टळेल यासाठी भूलन घास लावण्यात आली होती. यामुळे या बगिचाला भूलन बगिचा म्हंटलं जातं. त्याकाळी लोक या बगिच्याभोवती फिरणं टाळत असत. या भागातील अनेक लोकांमध्ये आजही या भूलन घासबद्दल भिती आहे.

जंगलांमध्ये विविध प्रकारचे भूलन घास उपलब्ध

पर्यावरण तज्ञांच्या मते छत्तीसगढ आणि मध्यप्रदेशच्या जंगलांमध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारेचे भूलन बुटी उपलब्ध आहेत. यात काळे आणि पांढऱ्या रंगाचं तण असलेलं हे गवत आढळतं. दोन्हींची पानं हिरवे असतात. एखाद्या गालीच्या प्रमाणे या भूलन घासच्या वेली पसरलेल्या असतात. तज्ञांच्या मते काही आयुर्वेदिक औषधांमध्ये या वेलीचा उपयोग केला जातो.

भूलन घासच्या विविध कथा

छत्तीसगढ आणि आसपासच्या परिसरात या भूलन घासबद्दल विविध कहाण्या  आणि समज आहेत. इथल्या गावांमधील काही वयोवृद्धांच्या मते भूलन बुटीच्या संपर्कात आल्यास काही तासांसाठी सगळं विसरायला होतं. सर्व काही विस्मरणात गेल्याने नदी, तळी, डोंगरं सारं काही मोठं दिसू लागतं.

अशा स्थितीत काही कळत नसल्याने लोग एकाच जागी गोल-गोल फिरत राहतात. तर काही वेळा ते जंगलांचे रस्ते भटकतात.

काहींच्या मते या विस्मृतीतून बाहेर येण्यासाठी एकच मार्ग आहे. तो म्हणजे त्यांनी जे कपडे परिधान केलेले असतात. त्यांना काढून ते कपडे उलटे करून पुन्हा परिधान करणं. असं केलं तरच ती व्यक्ती जंगलातून बाहेर पडू शकते. 

तर काहींच्या मते भूलन घास ही एकदा दिसल्यानंतर ती अदृश्य होते. काही ठराविक वेळेलाच ती दिसते. 

भूलन घास तोडून आणणं कठीण

ही भूलन घास तोडून आणणं कुणालाही शक्य नाही. जंगल परिसरात राहणारे आदिवासी लोकच तिला योग्य प्रकारे ओळखू शकतात. अनेकांनी आजवर ही वेल तोडून आणण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश मिळालं नाही. भूलन घास किंवा भूलन बुटी ही एक रहस्य असल्याचं इथल्या लोकांचं म्हणणं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com