esakal | मोदी-शहांचे निकटवर्तीय 'भुपेंद्र पटेल' नेमके आहेत तरी कोण?
sakal

बोलून बातमी शोधा

Bhupendra Patel

मोदी-शहांचे निकटवर्तीय 'भुपेंद्र पटेल' नेमके आहेत तरी कोण?

sakal_logo
By
सुधीर काकडे

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी राजीनामा दिला आणि मोठा राजकीय भुकंप झाला. त्यांच्या राजीनाम्यानंतर गुजरातमध्ये भारतीय जनता पक्ष आता मुख्यमंत्री म्हणून कोणाला संधी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागुन होतं. आज भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत हा निर्णय झाला असुन भुपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री नितिन पटेल यांची नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत होती, मात्र या दोघांपैकी कुणालाही संधी मिळाली नसुन भुपेंद्र पटेल (Bhupendra Patel) गुजरातचे मुख्यमंत्री होणार असल्याचे ठरले आहे.

गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी भूपेंद्र पटेल यांची वर्णी लागली असुन, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे निकटवर्तीय मानले जातात. ५९ वर्षीय भुपेंद्र पटेल हे घाटलोडिया मतसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. ते अहमदाबाद महापालिकेचे चेयरमन होते. तसेच अहमदाबाद अर्बन डेव्हलपमेंट  ऑथॉरिटी  चे अध्यक्ष देखील राहिले आहेत.

हेही वाचा: योगींच्या जाहिरातीत कोलकत्याचा उड्डाणपुल; तृणमूलचा आक्षेप

२०१७ ला घाटलोडिया मतदार संघातून त्यांनी गुजरात विधानसभा निवडणूक जिंकली. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेस उमेदवार शशिकांत पटेला यांना तब्बल १ लाख मतांनी पराभुत केले. ते माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचेही निकटवर्तीय मानले जातात. पटेल हे पाटिदार समाजातील कावडा या जातीतुन येतात. त्यांनी सिव्हील इंजिनीअरिंगमध्ये पदवी मिळवली आहे.

loading image
go to top