
सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीने माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाढदिवशीच अटक केलीय. छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा मुलगा चैतन्य ईडीच्या कचाट्यात सापडलाय. कथित दारू घोटाळा प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीकडून धाडसत्र राबवलं गेलं. यानंतर चैतन्य बघेल याला अटक केलीय. चैतन्यचा वाढदिवस असून त्याला ईडीने नवे पुरावे मिळाल्यानंतर अटक केलीय. ईडीने दुर्ग जिल्ह्यातील भिलाई शहरातील भूपेश बघेल यांच्या निवासस्थानी छापा टाकला होता.