Bibi Lal : हस्तिनापूर ते रामजन्मभूमीपर्यंत उत्खनन करणारे बीबी लाल यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bibi Lal Passed Away News

Bibi Lal : हस्तिनापूर ते रामजन्मभूमीपर्यंत उत्खनन करणारे बीबी लाल यांचे निधन

Bibi Lal Passed Away News नवी दिल्ली : बीबी लाल (ब्रज बासी लाल) (Bibi Lal) यांनी पुरातत्त्वशास्त्र म्हणून अनेक रहस्यांवरून पडदा उचलला आहे. अयोध्येत राम मंदिर असल्याचा मुद्दा त्यांच्यामुळेच सिद्ध झाला आणि उच्च न्यायालयानेही मान्य केला. जास्त वय असूनही ते सक्रिय होते. त्यांनी हस्तिनापूर, शिशुपालगड, पुराण किला, कालीबंगन यासह अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांचे उत्खनन केले होते. प्राध्यापक बीबी लाल यांचे शनिवारी निधन झाले.

२ मे १९२१ रोजी जन्मलेले बीबी लाल यांनी अलाहाबाद विद्यापीठातून संस्कृतमध्ये मास्टर्स केले. १९४३ मध्ये लक्षशिला येथे पोहोचले. तिथे तत्कालीन सुप्रसिद्ध ब्रिटिश पुरातत्त्वशास्त्र मॉर्टिमर व्हीलर यांच्याकडे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. बीबी लाल यांनी कार्यकाळात ५० हून अधिक पुस्तकांवर काम केले. याशिवाय त्यांचे १५० हून अधिक शोधनिबंध देश आणि जगातील जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहे.

हेही वाचा: पांढऱ्या ड्रेसमध्ये सोनाली सैगलचा ग्लॅमरस लूक

बीबी लाल (Bibi Lal) यांच्या काही उल्लेखनीय पुस्तकांमध्ये २००२ मध्ये प्रकाशित ‘द सरस्वती फ्लोज ऑन: द कंटिन्युटी ऑफ इंडियन कल्चर’ आणि २००८ मध्ये प्रकाशित ‘राम, हिज हिस्ट्री, मंदिर आणि सेतू: एव्हिडन्स ऑफ लिटरेचर, आर्किओलॉजी अँड अदर सायन्सेस’ यांचा समावेश आहे. १९५० ते १९५२ या काळात बीबी लाल यांनी महाभारताशी संबंधित विविध साइट्सवर काम केले.

या दरम्यान त्यांना गंगेच्या दोआब भागात अनेक पेंट केलेल्या ग्रे वेअर साइट्स सापडल्या. सुमारे २० वर्षांनंतर १९७५ मध्ये त्यांनी शोधनिबंध लिहिला. त्याचे शीर्षक होते ‘इन सर्च ऑफ इंडियाज ट्रॅडिशनल पास्ट: लाइट फ्रॉम द एक्सकॅव्हेशन्स ॲट हस्तिनापूर आणि अयोध्या’. यात त्यांनी आपल्या निष्कर्षांचा सारांश देत लिहिले की, येथे सापडलेले पुरातत्वीय पुरावे महाभारताच्या कथेला आधार असल्याचे सिद्ध करतात.

हेही वाचा: Shubhangi Atre : अंगुरी भाभीची ऑनलाइन फसवणूक; म्हणाली...

रामजन्मभूमीशी संबंधित शोध

महाभारताप्रमाणेच बीबी लाल यांनी रामायणातील स्थळे शोधली. त्यांनी १९७५ मध्ये ‘रामायण साइट्सचे पुरातत्व’ प्रकल्प सुरू केला होता. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, जिवाजी विद्यापीठ ग्वाल्हेर आणि पुरातत्व विभाग, उत्तर प्रदेश सरकार यांनी यासाठी निधी दिला होता. हा प्रकल्प ३१ मार्च १९७५ रोजी अयोध्येत सुरू झाला. यावेळी अयोध्या, भारद्वाज आश्रम, नंदीग्राम, चित्रकूट, शृंगवरपूर आदी ठिकाणांची तपासणी करण्यात आली. या संशोधनाच्या आधारे अयोध्येत राम मंदिर असण्याची बाब समोर आली.

Web Title: Bibi Lal Passed Away Discoverer Ram Janmabhoomi Excavation Of Historical Sites

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :historical places