कामगारटंचाईने सायकल उद्योग अडचणीत; कोरोनामुळे कमी मनुष्यबळावर काम

पीटीआय
Friday, 11 September 2020

सध्याच्या काळात सायकल उद्योग ४० ते ५० टक्के मनुष्यबळावर काम करत आहे. सायकल उद्योगाला मागणी वधारलेली असताना उद्योजकांना कामगारांचा तुटवडा सहन करावा लागत आहे. 

लुधियाना (पंजाब) - देशभरातून सायकलींची मागणी वाढत असताना लुधियाना मात्र ग्राहकांची मागणीची पूर्तता करण्यास असमर्थ आहे. लॉकडाउनमुळे कामगार आपल्या राज्यात परतल्याने सायकलींचे उत्पादन तुलनेने कमी झाले आहे. सध्याच्या काळात सायकल उद्योग ४० ते ५० टक्के मनुष्यबळावर काम करत आहे. सायकल उद्योगाला मागणी वधारलेली असताना उद्योजकांना कामगारांचा तुटवडा सहन करावा लागत आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पंजाबच्या लुधियानातील सायकल उद्योगात बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्‍चिम बंगाल येथील कामगार मोठ्या संख्येने काम करतात, असे भोगल सायकल्सचे ए.एस.भोगल यांनी सांगितले. सध्याच्या काळात पुरेशा प्रमाणात कामगार उपलब्ध झाल्यास लॉकडाउनच्या काळातील झालेले नुकसान भरून काढता येणे शक्य आहे, असे ते म्हणाले. एवॉन सायकल्स लिमिटेडचे ओंकार सिंग पाहवा म्हणाले की, सायकलीला देशभरातून मागणी येत आहे, परंतु कामगार अद्याप न परतल्याने सायकलीचा मागणीनुसार पुरवठा करणे शक्य नाही. याशिवाय फॅन्सी सायकलला मागणी वाढली आहे. कोरोना संसर्गामुळे नागरिक घरातच व्यायाम करणे पसंत करत असल्याने व्यायामासाठी उपयुक्त असणाऱ्या सायकलीला मागणी वाढली आहे. परंतु कामगारांची कमतरता आणि परदेशातून सुट्या भागांची आवक कमी झाल्याने सायकलीचे उत्पादन पुरेशा प्रमाणात होत नसल्याचे चित्र आहे. परिणामी सायकल उद्योगाच्या संघटनेने सरकारला राज्यात गेलेल्या कामगारांना परत आणण्याबाबत व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. आजघडीला ४० ते ४५ टक्क्यांच्या मनुष्यबळावर सायकलीचे उत्पादन केले जात आहे. उत्पादन पूर्ववतपणे सुरू करण्यासाठी सरकारने सहकार्य करावे, असे आवाहन संघटनेचे गुरमीत सिंग कुलर यांनी केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारत-चीन तणावाचाही परिणाम
लॉकडाउनमुळे उद्योग-व्यवसाय ठप्प पडले होते. परंतु, आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झालेली असताना भारत-चीन तणावामुळे सायकल उद्योगाच्या अडचणीत भर पडली आहे. पंजाबमधील सायकल उद्योग हा बहुतांश प्रमाणात सुट्या भागांसाठी चीनवर अवलंबून आहे. सध्या उद्योगपतींकडे अन्य कोणताही पर्याय नाही. अशा स्थितीत उद्योगांना अन्य पर्यायांचा विचार करावा लागणार आहे. ही बाब मोठ्या उद्योगांना शक्य आहे. मात्र, सुटे भाग तयार करणाऱ्या लघुउद्योजकांना नव्याने बदल करावे लागणार आहेत. ट्रान्समिशन पार्ट्‌स, अलॉय हँडल बार, अलॉय हब्स, अलॉय चेन, व्हील आणि क्रेंक, डिस्क ब्रेक, कोस्टर हब यासाठी चीन आणि अन्य देशांवर अवलंबून राहावे लागते.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सायकल उद्योग उलाढाल  (दशलक्ष डॉलर)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bicycle industry is in trouble due to labor shortage reduce manpower due to corona


२६४  २०१८-१९
१४९  २०१९-२०