कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहांची अदलाबदली; प्रशासनाने दिलेले कारण पाहून व्हाल चकित

Big commotion over the exchange of corpses of corona patients in Uttar Pradesh
Big commotion over the exchange of corpses of corona patients in Uttar Pradesh

गाझियाबाद : देशात कोरोनाचा मोठा कहर सुरुच आहे. रोज जवळपास 1 हजार रुग्ण कोरोनामुळे दगावत आहेत. ह्या दगावलेल्या रुग्णांची मृत्यूनंतरही फरफट होताना दिसतेय. अशीच एक गंभीर घटना उत्तरप्रदेशात घडली आहे. मेरठ मेडिकल कॉलेजमध्ये कोरोनामुळे मरण पावलेलेल्या दोन मृतदेहांची शवागृहातच अदलाबदल झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. अंत्यसंस्कारच्या दरम्यान कुटूंबातील एकाने रुग्णाचा चेहरा पाहिल्यावरही त्याला धक्काच बसला.  कारण तो मृतदेह दुसऱ्याच कुणाचा तरी असल्याचे दिसून आले. 

गाझियाबाद जिल्ह्यातील मोदीनगर येथील 65 वर्षीय गुरुवचन आणि 58 वर्षीय यशपाल असे कोरोनाने मृत झालेल्यांची नावे आहेत. गुरुवचन यांचे पार्थिव यशपालच्या कुटूंबाकडे देण्यात आले होते. त्यांनी चेहरा न उघडता शनिवारी पार्थिवावर अंत्यसंस्कारही केले. जेव्हा गुरुवचनच्या कुटूंबाने स्मशानभूमीत अंत्यसंस्कारच्यावेळी तोंडावरील प्लास्टिकचं आवरण दूर केलं तेव्हा त्यांना पार्थिव गुरवचन यांचे नसून अन्य कोणाचे असल्या लक्षात आले. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मोदीनगर येथील रहिवासी गुरुवचन यांना मंगळवारी (१ सप्टेंबर) रोजी श्वसनाच्या त्रास होत असल्याने मेरठ मेडिकल कॉलेजमधील कोरोनाव्हायरस वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याने शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. त्याच रात्री यशपाल जे मेरठचे रहिवासी होते, त्यांचा त्याच वॉर्डात मृत्यू झाला होता. या गोंधळाबद्दल माहिती देताना कोविड वॉर्डचे प्रभारी डॉ. लोकेश म्हणाले की, दोन्ही मृतदेह संबंधित कुटूंबियांच्या ताब्यात देण्यापूर्वी त्यांना शवविच्छेदनगृहात नेण्यात आले होते पण दारूच्या नशेत काम करणाऱ्या कामगाराने इथं टॅग चूकीचे दिल्याने मृतदेहांची अदलाबदल झाली.

गुरुवचन यांचे पुतणे विकास शर्मा म्हणाले, शनिवारी रात्री आठच्या सुमारास आम्हाला रुग्णालयातून गुरुवचन हे मृत झाले म्हणून फोन आला. आम्हाला कोविड प्रोटोकॉलनुसार मृतदेह घेण्यास आणि अंत्यसंस्कार करण्यास सांगितले गेले.  दुसर्‍या दिवशी सकाळी 8च्या सुमारास आम्ही मृतदेह स्मशानभूमीकडे नेला आणि आम्ही त्याच्या चेहऱ्यावरील आवरण उघडलं तसं आम्हाला धक्काच बसला, कारण हा मृतदेह गुरुवचन यांचा नव्हताच. यानंतर गुरुवचनच्या कुटूंबियांनी यशपाल यांच्या कुटुंबियांना याची माहिती दिल्यावर यशपाल याने त्याच्या वडिलांचा मृतदेह स्मशानभूमीत येऊन अंत्यसंस्कार केले.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com