esakal | केंद्राचा मोठा निर्णय; आयात होणाऱ्या लस, ऑक्सिजनवरील कर माफ

बोलून बातमी शोधा

narendra modi
केंद्राचा मोठा निर्णय; आयात होणाऱ्या लस, ऑक्सिजनवरील कर माफ
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळं रुग्णांचे हाल होत आहेत. यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ऑक्सिजन आणि कोरोना प्रतिबंधक लस परदेशातून आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या उपकरणांवरील सीमा शुल्क आणि आरोग्य उपकर पुढील तीन महिन्यांसाठी माफ करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली देशातील ऑक्सिजन पुरवठा कसा वाढवायचा याबाबत आढावा बैठक पार पडली. यावेळी पंतप्रधानांनी महसूल विभागाला आदेश दिले की, आयात केलेले ऑक्सिजन आणि त्यासंबंधी उपकरणांना देशात तात्काळ मंजुरी द्यावी. त्याचबरोबर आयात केलेल्या लसींवरील बेसिक सीमाशुल्क पुढील तीन महिन्यांसाठी माफ करण्यात यावं.

हेही वाचा: कोरोना काळात भारतविरोधी शक्तींच्या कट-कारस्थानांपासून जनतेनं सावध रहावं - RSS

यावेळी मोदींनी सर्व मंत्रालये आणि विभागांना ऑक्सिजन आणि वैद्यकीय सुविधांच्या तात्काळ पुरवठ्याबाबत एकमेकांच्या कामांमध्ये समन्वय ठेवण्याच्या सूचना दिल्या. यावेळी हे निश्चित करण्यात आलं की, ऑक्सिजन आणि ऑक्सिजनसंबंधी इतर उपकरणांच्या आयातीवरील बेसिक सीमाशुल्क आणि आरोग्य उपकर पुढील तीन महिन्यांसाठी तात्काळ प्रभावानं सूट देण्यात यावी, असे आदेशही दिले.

हेही वाचा: 'या लढ्यात मी भारतीयांसोबत'; कोरोना संकटात इम्रान खान यांनी भारतासाठी केली प्रार्थना

देशाला सध्या रुग्णांना घरच्या आणि रुग्णालयातील उपचारांसाठी मेडिकल ग्रेड ऑक्सिजन आणि संबंधीत उपकरणांची तातडीची गरज आहे. ही व्यवस्था सुरळीत चालावी यासाठी सर्वांनी समन्वयानं काम करणं गरजेचं आहे, यावर या बैठकीत पतंप्रधान मोदींनी भर दिला.