esakal | कोरोना काळात भारतविरोधी शक्तींच्या कट-कारस्थानापासून जनतेनं सावध रहावं - RSS

बोलून बातमी शोधा

Dattatray Hosbale
कोरोना काळात भारतविरोधी शक्तींच्या कट-कारस्थानांपासून जनतेनं सावध रहावं - RSS
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : कोरोना महामारीनं देशापुढे पुन्हा एकदा मोठ आव्हान निर्माण केलं आहे. या काळात भारतविरोधी शक्ती आपला फायदा उठवण्याच्या दृष्टीने कट-कारस्थानं करु शकतात. याबाबत देशातील जनतेनं सावध रहावं, असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरचिटणीस दत्तात्रय होसबाळे यांनी दिला आहे.

होसबाळे म्हणाले, "देशातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता भारतविरोधी शक्ती याचा फायदा घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. याद्वारे ते देशात नकारात्मकतेचं आणि अविश्वासाचं वातावरण तयार करु शकतात. या विध्वंसक शक्तींचा डाव ओळखून देशातील जनतेनं सावध रहावं."

हेही वाचा: Covishield भारतात सर्वात महाग; जाणून घ्या इतर देशातील किंमत

कोरोना महामारीनं देशात पुन्हा एकदा मोठं आव्हान निर्माण केलं आहे. या काळात जनतेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी संघाचे स्वयंसेवक देशभरात सक्रीयपणे विविध सेवा-सुविधा पुरवण्याचे काम करत आहेत, अशी माहितीही यावेळी होसबाळे यांनी दिली.