पेट्रोल-डिझेलनंतर सीएनजीबाबत मोठी बातमी; सियामने म्हटले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Big news about CNG after petrol-diesel

पेट्रोल-डिझेलनंतर सीएनजीबाबत मोठी बातमी; सियामने म्हटले...

पेट्रोल व डिझेलच्या दरात कपात केल्यानंतर आता सीएनजीच्या (CNG) किमतीबाबत मोठी बातमी आहे. सियामने सरकारला सीएनजीच्या किमती कमी करण्याची, स्टील आणि प्लॅस्टिक उत्पादनांच्या काही कच्च्या मालावरील आयात शुल्क कमी करण्याची विनंती केली आहे. असे झाल्यास आगामी काळात सीएनजीचे दर कमी होऊ शकतात. (Big news about CNG after petrol-diesel)

ऑटो उद्योग पेट्रोल आणि डिझेलवरील (petrol-diesel) उत्पादन शुल्क कमी करण्याच्या निर्णयाचे स्वागत करतो. या निर्णयामुळे महागाईचा ताण कमी होऊन सर्वसामान्यांना दिलासा मिळेल, असे सियामने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना ट्विटरवर टॅग करीत लिहिले आहे. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सने (सियाम) देखील सरकारला सीएनजीच्या किमती कमी करण्याची विनंती केली आहे.

हेही वाचा: इतिहासकार इरफान हबीब म्हणतात; ...तर लाल किल्ला-ताजमहाल तोडून बघा

किमतीत कपात केल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळेल आणि सार्वजनिक वाहतूक सुलभ होईल आणि स्वच्छ वातावरण उपलब्ध होईल. गेल्या सात महिन्यांत सीएनजीच्या (CNG) किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. स्टील आणि प्लॅस्टिक उत्पादनांच्या कच्च्या मालावरील आयात शुल्क कमी करण्याची विनंतीही संघटनेने सरकारला केली. यामुळे देशांतर्गत बाजारात स्टीलच्या किमती कमी होण्यास मदत होईल, असे सियामने म्हटले आहे.

इंधन उत्पादनांच्या सततच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या जीवनावर होणारा परिणाम लक्षात घेऊन सरकारने शनिवारी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे ८ आणि ६ रुपयांनी कपात करण्याची घोषणा केली, हे विशेष...

Web Title: Big News About Cng After Petrol Diesel Significant Increase In Prices In Seven Months

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :cngpetrol and diesel