NIA ला मोठे यश, ISIS च्या सक्रिय सदस्याला दिल्लीतील बाटला हाऊसमधून अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NIA

NIA ला मोठे यश, ISIS च्या सक्रिय सदस्याला दिल्लीतील बाटला हाऊसमधून अटक

स्वातंत्र्य दिनापूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) मोठे यश मिळाले आहे. एनआयएने देशाची राजधानी दिल्लीतील बाटला हाऊस येथून प्रतिबंधित दहशतवादी संघटना ISIS शी संबंधित एका संशयिताला अटक केली आहे.

अटक करण्यात आलेला संशयित हा इसिसचा कट्टर आणि सक्रिय सदस्य आहे. मोहसीन अहमद असे संशयिताचे नाव असून तो बिहारचा रहिवासी आहे. यावेळी ISISचा ऑनलाइन प्रचार करत होता. काही काळ ते बाटला हाऊसमध्ये राहत होते. तिथून त्याला अटक करण्यात आली आहे. तो भारत आणि परदेशातील ISIS बद्दल सहानुभूती असलेल्या लोकांकडून निधी गोळा करत असे. यासाठी त्याने क्रिप्टोकरन्सीचा वापर केला आहे

एनआयएनुसार अहमद हा कट्टरपंथी आणि इसिसचा सक्रिय सदस्य आहे. भारत आणि परदेशातील सहानुभूतीदारांकडून ISIS साठी निधी गोळा करण्यात सहभाग असल्याबद्दल त्याला अटक करण्यात आली आहे. एनआयएच्या पथकाने अहमदच्या बाटला येथील घरावर छापा टाकला. छाप्यादरम्यान त्याच्या घरातून अनेक गुन्ह्याची कागदपत्रे सापडली आहेत. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांना अलर्ट जारी करण्यात आला होता. दरम्यान, इंटेलिजन्स ब्युरोने दिल्ली पोलिसांना धोक्याचा इशारा दिला असून सतर्क राहण्यास सांगितले आहे. इंटेलिजन्स ब्युरोने 10 पानांचा अहवाल जारी केला आहे, ज्यामध्ये जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा ते उदयपूर आणि अमरावती या दहशतवादी संघटनांचाही उल्लेख करण्यात आला आहे.

Web Title: Big Success For Nia Active Member Of Isis Arrested From Batla House In Delhi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..