Bigger Traitor : गांधी घराण्यापेक्षा मोठा गद्दार कोणी नाही; भाजप खासदाराचा राहुलवर पलटवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rahul gandhi Latest News

गांधी घराण्यापेक्षा मोठा गद्दार कोणी नाही; भाजप खासदाराचा राहुलवर पलटवार

Bigger Traitor Gandhi family नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) हावभावांमध्ये देशद्रोही संघटना असल्याचे सांगणाऱ्या काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. झारखंडमधील गोड्डाचे खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांनी गांधी घराण्यापेक्षा मोठा देशद्रोही (Bigger Traitor) कोणी नसल्याचे म्हटले आहे. दुबे यांनी भारताची फाळणी, बोफोर्स घोटाळा, भोपाळ वायू दुर्घटना व पाक-चीनने केलेल्या जमिनीवरील कब्जा यांचा उल्लेख करीत गांधी कुटुंबावर हल्ला चढवला.

लेडी माऊंट बेटन यांच्या सांगण्यावरून भारत आणि पाकिस्तान हे दोन देश बनले. त्यांचे कुटुंब देशद्रोही (Bigger Traitor) आहे. क्वात्रोचीने बोफोर्समध्ये पैसे घेतले. त्यांना यांनी पळवून लावले. भोपाळ गॅस घटनेत अँडरसनची एवढी मोठी भूमिका होती. त्यालाही यांनीच पळवले. चीनने आमच्या भूमीवर कब्जा केला. आम्ही आजही पीओके परत आणू शकलो नाही. या देशात गांधी घराण्यापेक्षा मोठा गद्दार कोण आहे, असेही निशिकांत दुबे यांनी संसदेच्या संकुलात म्हटले.

हेही वाचा: Cabinet Expansion : ठरलं! रविवारपर्यंत होणार मंत्रिमंडळाचा विस्तार; केसरकर म्हणाले...

म्हणूनच राहुल गांधींना (Rahul Gandhi) आणखी एक देशद्रोही दिसतो. ते स्वतः देशद्रोही आहे. त्यांचे कुटुंब देशद्रोही आहे. हा इतिहास आहे. मी काही नवीन बोलत नाही आहे, असेही निशिकांत दुबे म्हणाले. बुधवारी आरएसएसचे नाव न घेता राहुल गांधींनी या संघटनेला देशद्रोही म्हटले होते.

‘हर घर तिरंगा’ मोहिमेवर भाजपवर (BJP) निशाणा साधत राहुल गांधी यांनी ट्विट केले की, ‘कर्नाटक खादी ग्रामोद्योगच्या सर्व सहकाऱ्यांना भेटून खूप आनंद झाला. इतिहास साक्षी आहे की, ‘हर घर तिरंगा’ मोहीम चालवणारे त्या देशद्रोही संघटनेतून निघाले ज्यांनी ५२ वर्षे तिरंगा फडकवला नाही. स्वातंत्र्यलढ्यापासून ते काँग्रेस पक्षाला तेव्हाही रोखू शकले नाहीत आणि आजही रोखू शकणार नाहीत.’

Web Title: Bigger Traitor Gandhi Family Bjp Mp Nishikant Dubey Rahul Gandhi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BjpRahul GandhiCongress
go to top