

Patna Accident News
ESakal
बिहारची राजधानी पाटणा येथे एका अनियंत्रित कारने सहा जणांना चिरडल्याने घटनास्थळी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. या घटनेत एका वृद्धाचा मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. मृताचे नाव चान्सी राय असे आहे, ते ६० वर्षांचे होते. या घटनेनंतर खळबळ उडाली आहे.