Bihar Politics : सत्ता बदलाचा थेट परिणाम राज्यसभेच्या समीकरणावर, हरिवंश राजीनामा देणार?

बिहारमध्ये सत्तापरिवर्तन होताच याचा थेट परिणाम भाजपच्या संख्याबळावर होणार आहे.
Nitish Kumar Harivansh
Nitish Kumar Harivanshesakal
Summary

बिहारमध्ये सत्तापरिवर्तन होताच याचा थेट परिणाम भाजपच्या संख्याबळावर होणार आहे.

Bihar Politics : बिहारमध्ये सत्तापरिवर्तन होताच याचा थेट परिणाम भाजपच्या संख्याबळावर आणि राज्यसभेतील समीकरणावर होणार आहे. आता राज्यसभेतील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) संख्याबळात किंचित घट होणार आहे. त्याचवेळी राज्यसभेचे उपसभापती हरिवंश (Rajya Sabha Deputy Speaker Harivansh) यांच्याबाबत संभ्रम आहे.

हरिवंश हे जेडीयूच्या (JDU) कोट्यातून आणि भाजपच्या (BJP) पाठिंब्यानं राज्यसभेचे उपसभापती झालेत. अशा स्थितीत जेडीयूनं एनडीए सोडलं असताना ते उपसभापतीपदाचा राजीनामा देणार का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. मात्र, यासंदर्भात हरिवंश यांच्याकडून अद्याप कोणतंही वक्तव्य आलेलं नाहीय. 303 सदस्यांसह भाजप हा लोकसभेतील एकमेव सर्वात मोठा पक्ष नाहीय, तर दोन तृतीयांशपेक्षा जास्त सदस्यांसह सर्वात मोठा पक्ष आहे. एचटीनं हा अहवाल दिलाय. इथं पक्षाला बिल पास करण्यासाठी दुसऱ्या पक्षाची गरज नाहीय. मात्र, लोकसभेत विधेयक मंजूर करताना एनडीएसह इतर काही पक्षांनीही त्याला पाठिंबा दिलाय.

Nitish Kumar Harivansh
Bihar Politics : नितीश कुमार पंतप्रधान होण्याच्या शक्यतांबाबत काय म्हणाले प्रशांत किशोर?

तर, दुसरीकडं राज्यसभेत कोणतंही विधेयक मंजूर करण्यासाठी त्यांना त्यांच्या मित्रपक्षांची गरज असते. 237 सदस्य असलेल्या राज्यसभेत भाजपचे संख्याबळ फक्त 97 आहे. इथं भाजप बहुमतात नाही हे स्पष्ट आहे. राज्यसभेत तो निश्चितच सर्वात मोठा पक्ष असला तरी, विधेयक मंजूर करण्यासाठी मित्रपक्षाच्या भूमिकेवर अवलंबून राहावं लागेल. अनेकदा राज्यसभेत त्यांना AIADMK च्या चार सदस्यांचा आणि बिजू जनता दल, YSR काँग्रेसच्या 18 सदस्यांचा पाठिंबा असतो.

Nitish Kumar Harivansh
Bacchu Kadu : राजकारणात योग्यवेळी योग्य घाव मारावा लागतो; बच्चू कडूंचा कोणाला इशारा

नितीशकुमार यांचा पक्ष जनता दलाचे राज्यसभेत 5 तर लोकसभेत 16 सदस्य आहेत. अलीकडं, जेव्हा भाजप राज्यसभेत सर्वात मोठा पक्ष नव्हता, तेव्हाही काही वादग्रस्त विधेयकं मंजूर करण्यासाठी त्यांना विरोधी पक्षांचं सहकार्य मिळू शकलं. जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना (दुरुस्ती) विधेयक मंजूर करून घेण्यासाठी बहुजन समाज पक्ष आणि आम आदमी पार्टीसारख्या विरोधी पक्षांचाही पाठिंबा मिळाला. तिहेरी तलाक बेकायदेशीर ठरवणारे वादग्रस्त विधेयक मंजूर करण्यात भाजप यशस्वी झाला, तर JD(U) नं त्याला विरोध केला. आता राज्यसभेवरुन पेच निर्माण झाला आहे. हरिवंश यांचं नाव भाजपनं सुचवलं असलं, तरी अनेक पक्षांच्या पाठिंब्यानं ते राज्यसभेचे उपसभापती बनलेत. त्यांना बिजू जनता दल आणि शिवसेना या बिगर एनडीए पक्षांचाही पाठिंबा मिळाला. त्यामुळं भाजपची भूमिका काय असेल, याची प्रतीक्षा करू. सप्टेंबर 2020 मध्ये आरजेडीचे उमेदवार मनोज झा यांचा पराभव करून हरिवंश हे राज्यसभेचे उपसभापती झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com