esakal | Bihar Election : तिसऱ्या टप्प्यात झाले 55.22 टक्के मतदान
sakal

बोलून बातमी शोधा

bihar poll main 1.jpg

बिहारमध्ये अखेरच्या टप्प्यात 15 जिल्ह्यातील 78 मतदारसंघात मतदान झाले.  या 78 मतदारसंघात एकूण 1204 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये बंद झाले. 

Bihar Election : तिसऱ्या टप्प्यात झाले 55.22 टक्के मतदान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पाटणा Bihar Assembly Election 2020- बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आज (दि.7) तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान पार पडले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकूण 55.22 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. दरम्यान, पूर्णिया जिल्ह्यात आरजेडी नेत्याच्या हत्येमुळे निवडणुकीला गालबोट लागले आहे. 

बिहारमध्ये अखेरच्या टप्प्यात 15 जिल्ह्यातील 78 मतदारसंघात मतदान झाले.  या 78 मतदारसंघात एकूण 1204 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये बंद झाले. 

याआधी दुसऱ्या टप्प्यात 3 नोव्हेंबर रोजी 17 जिल्ह्यांतील 94 जागांसाठी 53.51 टक्के मतदान झाले. तसेच पहिल्या टप्प्यात 28 ऑक्टोबर रोजी 16 जिल्ह्यांतील 71 जागांसाठी 53.54 टक्के मतदान झाले. मतमोजणी 10 नोव्हेंबर रोजी होईल.

Live Updates:

-सायंकाळी पाच वाजेपर्यंत 55.22 टक्के मतदान

- अज्ञातांनी केलेल्या बेछूट गोळीबारात आरजेडी नेता बेनी सिंहचा मृत्यू

- दुपारी तीनच्या सुमारास आरजेडी नेता बेनी सिंह याच्यावर बेछूट गोळीबार

- दुपारी एक वाजेपर्यंत 34.82 टक्के मतदान झाले आहे.

- दरभंगा येथील ग्रामस्थ तात्पुरत्या स्वरुपात बांधलेल्या पुलावरुन मतदानासाठी जात होते.

- कथिहार येथे एका वयोवृद्ध नागरिकाला पलंगावरुन मतदानासाठी आणले होते.

- सकाळी 11 वाजेपर्यंत 19.77 टक्के मतदान झाल्याची नोंद

- ज्येष्ठ नेते शरद यादव यांच्या कन्या तथा काँग्रेसच्या उमेदवार सुभाषिनी राज राव यांनी माधेपुरा येथे मतदान केले.

- सकाळी 9 वाजेपर्यंत 7.69 टक्के मतदान

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना आवाहन केले 

- सहरसा येथील मतदान केंद्रवरील दृश्य

- तिसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदानास सुरुवात