Bihar Result Update: RJD सर्वात मोठा पक्ष पण NDA ला आघाडी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 November 2020

बहुतांश एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादव यांच्या महाआघाडीला अधिक जागा मिळतील, असा अंदाज आहे. तर सत्ताधारी नितीशकुमार यांच्या एनडीएला महाआघाडीच्या तुलनेत कमी जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला आहे. 

पाटणा Bihar Election 2020 - देशाचे लक्ष लागलेल्या बिहार विधानसभेच्या निकालात नितीशकुमार चौथ्यांदा मुख्यमंत्री होणार असल्याचे सध्यातरी स्पष्ट झाले आहे. परंतु, तेजस्वी यादव यांनी चांगलीच मुसंडी मारली आहे. महाआघाडीला 110 जागांवर थांबाव लागले आहे. एनडीएने 125 जागा जिंकून सत्ता राखली आहे.

Update:

अद्याप 17 जागांचा निकाल जाहीर होणं बाकी - निवडणूक आयोग

66 राउंड अजुन शिल्लक असून तासाभरात निकाल जाहीर होतील - निवडणूक आयोग 

रात्री एक वाजेपर्यंत 222 जागांचे निकाल जाहीर झाले. यामध्ये सर्वाधिक राष्ट्रीय जनता दलाने 70 जागा जिंकल्या तर त्याखालोखाल भाजपने 64 जागी विजय मिळवला. जनता दलाला 40 तर काँग्रेसला 18 जागी विजय मिळवता आला. 

निवडणूक आयोग घेणार मध्यरात्री एक वाजता घेणार पत्रकार परिषद

रात्री अकरा वाजता जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार 183 पैकी 90 जागा एनडीएने तर 86 जागा महाआघाडीने जिंकल्या आहेत. 6 जागी इतर उमेदवार विजयी झाले आहेत.

165 जागांचे निकाल जाहीर; भाजपला मागे टाकून राजदची मुसंडी

भाजप 47, राजद 52, दजयू 29, काँग्रेस 12

रात्री 8.30 वाजेपर्यंत 74 जागांचे निकाल जाहीर; भाजप 22, राजद 20, जदयू 13, काँग्रेस 7, इतर 19

लालु यादव यांची मुलगी राजलक्ष्मी यादव यांनी ट्विट करून म्हटलं की, 'निसर्गाचा नियम आहे कमळ रात्री कोमेजतं आणि कंदील प्रकाश देतो'

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, 13 जागांवर 500 मतांहून कमी आघाडी, 21 जागा एक हजारांपेक्षा कमी फरक तर 32 जागांवर 2 हजारांपेक्षा कमी आघाडी आहे. त्यामुळे जवळपास 65 जागी काट्याची टक्कर बघायला मिळेल.

सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत 20 जागांचे निकाल जाहीर; भाजप, आरजेडी प्रत्येकी 6 जागी विजयी तर काँग्रेस, VIP ला 2 तर AIMIM आणि CPI (M) एका जागेवर विजयी

आमच्याकडे रिअल टाइम डेटानुसार सध्या 84 जागांवर आघाडी आहे. अनेक ठिकाणी पोस्टल मते मोजण्यात आलेली नाहीत : राष्ट्रीय जनता दल

भाजपची 70 हून अधिक जागांवर आघाडी

आतापर्यंत 9 जागांचे निकाल जाहीर, भाजपचा 3 जागांवर विजय; राजद, जदयूला प्रत्येकी दोन तर काँग्रेस आणि इतर एका जागी विजयी

हे वाचा - Bihar Election 2020: काँग्रेसला जास्तीच्या जागा दिल्याने RJDला फटका?​

- एनडीएला 129 तर महागठबंधनला 102 जागांवर आघाडी; बसपा 2, AIMIM 4, लोजपा 2 आणि अपक्ष 2 उमेदवारांना आघाडी

- इव्हीएम हॅकच्या आरोपाचे निवडणूक आयोगाकडून खंडन

- निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार एनडीएने 125 जागांवर आघाडी घेतली आहे.

- आरजेडीचे तेजप्रताप यादव हसनपूर मतदारसंघात पिछाडीवर, जेडीयूच्या राजकुमार राय पुढे

- नितीशकुमार यांचे अनेक मंत्री पिछाडीवर. विशेषतः रमेश ऋषिदेव सिंहेश्वर येथून आघाडीवर आहेत. जयकुमारसिंह हे दिनारा येथून, खुर्शीद अहमद सिकटा येथून तर शैलशकुमार हे जमालपूर मतदारसंघातून पिछाडीवर आहेत.

- तेजप्रताप यादव यांचे सासरे जेडीयूचे उमेदवार चंद्रिका राय पिछाडीवर 

- जुमई येथून भाजपच्या श्रेयसी सिंह आघाडीवर. श्रेयसी या माजी केंद्रीय मंत्री दिवंगत दिग्विजय सिंह यांच्या कन्या आहेत. 

- तेजस्वी यादव यांच्या कार्यालयाबाहेर समर्थकांची मोठी गर्दी

- इमामगंज येथून जीतनराम मांझी पुढे

- राघोपूर मतदारसंघातून तेजस्वी यादव आघाडीवर

- तेजस्वी यादव यांच्या नेतृत्त्वाखालील महाआघाडी 72 जागांवर तर नितीशकुमार यांच्या नेतृत्त्वाखालील एनडीए 40 जागांवर पुढे

-  पाटणा येथील अनुग्रह नारायण कॉलेज मतमोजणी केंद्रावरील दृश्य

- मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

-  मतमोजणी सुरु होण्यापूर्वी ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या. 

- बिहारमधील मतमोजणी केंद्रावरील आज सकाळचे दृश्य

 

- सकाळी 8 वाजता मतमोजणीस सुरुवात होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bihar Assembly Election Result Live Update Nitish kumar tejashwi yadav rjd jdu bjp congress