esakal | Bihar Election 2020: काँग्रेसला जास्तीच्या जागा दिल्याने RJDला फटका?
sakal

बोलून बातमी शोधा

congress

सध्या बिहारच्या निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी 3 टप्प्यात मतदान झाले होते.

Bihar Election 2020: काँग्रेसला जास्तीच्या जागा दिल्याने RJDला फटका?

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

पाटना- सध्या बिहारच्या निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी 3 टप्प्यात मतदान झाले होते. आतापर्यंत आलेल्या निकालामध्ये एनडीएने 123 जागांवर तर 111 ठिकाणी महाआघाडी ( राजद- काँग्रेस) आघाडीवर आहे. ज्यावेळी काँग्रेस आणि राजदमध्ये युती झाली होती, त्यावेळी राजद 144 आणि काँग्रेस 70 जागांवर लढणार असं ठरलं होतं. तर राहिलेल्या 29 जागा इतर पक्षांना दिल्या होत्या. 

जागावाटपात काँग्रेसला मागील वेळेसपेक्षा जास्तीच्या जागा-
मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या वाट्याला 41 जागा आल्या होत्या. त्यामध्ये काँग्रेसने 27 जागा जिंकल्या होत्या. पण 2020 विधानसभा निवडणुकीत जागावाटपात राजदने काँग्रेसला 20 जागा वाढवून दिल्या होत्या. त्यामुळे यावेळेस काँग्रेसच्या वाट्याला 70 जागा आल्या होत्या. विशेष म्हणजे ज्या जास्तीच्या 20 जागा काँग्रेसला दिल्या होत्या त्या सर्व जागा 2015 च्या विधानसभा निवडणुकीत राजदने लढविल्या होत्या. पण राजदला या 20 ठिकाणी एकही उमेदवार निवडून आणता आला नव्हता. 

Bihar Election: रात्री उशिरापर्यंत चालणार मतमोजणी, निवडणूक आयोगानं सांगितलं कारण

काँग्रेसचा स्ट्राईक रेट उतरला-
सध्या काँग्रेस 20 ठिकाणी आघाडीवर आहे. पण यापुर्वी 2015 मध्ये 27 ठिकाणी काँग्रेसला विजय मिळाला होता. म्हणजे 2020 निवडणुकीत 70 जागांवर लढूनही काँग्रेसच्या जागा कमी झाल्या होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे काँग्रेसचा स्ट्राईक रेट कमी होत असल्याचे दिसत आहे. याचमुळे तेजस्वी यादव यांचा काँग्रेसला जास्त जागा देण्याचा निर्णय चुकला, अशी चर्चा दबक्या आवाजात का होईना, पण सुरु आहे.  

हेही वाचा- Bihar Election : शिवसेनेच्या तुतारीचा आवाज दुमदुमलाच नाही; डिपॉझीट जप्त होण्याची चिन्हे

निकालाचे कल बाकी-
सध्या निकालाचे कल पुर्णपणे समोर आले नाहीत. रात्री उशीरापर्यंत मतमोजणी चालण्याची शक्यता आहे. जर अचानक चक्रे फिरली तर बिहारमध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण होऊ शकते दरम्यान,यंदाची ही निवडणूक जेडीयू-भाजपा यांनी समसमान जागांवर निवडणूक लढवली आहे. 243 पैकी भाजपाने 121 तर जेडीयूने 122 जागांवर ही निवडणूक लढवली आहे. भाजपला जागावाटपामध्ये समान वाटा देण्याचा फटका जेडीयूला बसला आहे, असंही म्हटलं जात आहे. आणि आतातर भाजप हाच मोठा भाऊ बनण्याच्या वाटेवर आहे.

(सौजन्य- द प्रिंट)