

A speeding bus crashed into a crowd gathered beside NH-727 during a family celebration in Betia, Bihar, killing five people and injuring others
esakal
बेतिया : बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यातील बेतिया येथे शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. बेतिया-लौरिया मुख्य मार्गावरील (एनएच-७२७) बसवारिया आणि परौतोला दरम्यान रस्त्याच्या कडेला सुरू असलेला नृत्य-संगीताचा कार्यक्रम पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीत भरधाव बस घुसली. या दुर्घटनेत १८ जणांना बसची धडक बसली असून पाच जणांचा मृत्यू झाला. अन्य पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.