esakal | बिहारमध्ये १८ मंत्र्यांवर फौजदारी गुन्हे;भाजपची संख्या सर्वाधिक
sakal

बोलून बातमी शोधा

बिहारमध्ये १८ मंत्र्यांवर फौजदारी गुन्हे;भाजपची संख्या सर्वाधिक

भाजपचे सर्व म्हणजे १४ मंत्री कोट्यधीश असून ‘जेडीयू’च्या ११ पैकी नऊ मंत्री , ‘हम’ आणि ‘व्हीआयपी’चा प्रत्येकी एक आणि ‘जेडीयू’च्या कोट्यातील एक अपक्ष मंत्रीही धनाढ्य आहे. 

बिहारमध्ये १८ मंत्र्यांवर फौजदारी गुन्हे;भाजपची संख्या सर्वाधिक

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

पाटणा - बिहारच्या मंत्रिमंडाळातील २८ पैकी १८ मंत्र्यांवर फौजदारी गुन्हे दाखल असून त्यातील १४ जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची नोंद ‘नॅशनल वॉच इलेक्शन’ आणि ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म’ (एडीआर) या संस्‍थांच्या अहवालात केली आहे. 

मंत्रिमंडळात समावेश केलेल्या मंत्र्यांविरोधात गुन्ह्यांचे विश्‍लेषण या संस्थांनी केले. अहवालात म्हटले आहे की, संयुक्त जनता दलाच्या (जेडीयू) ११ मंत्र्यांपैकी चार मंत्र्यांवर फौजदारी गुन्हे असून तीन मंत्र्यांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. भाजपच्या १४ मंत्र्यांमधील ११ जणांवर फौजदारी गुन्हे आहेत. त्यातील आठ मंत्र्यांवर गंभीर स्वरूपाच फौजदारी गुन्हे आहे. राज्य सरकारमधील हिंदुस्तानी अवामी मोर्चा (हम) आणि विकसनशील इंसान पार्टी (व्हीआयपी) या पक्षाचा प्रत्येकी एक आमदार मंत्री असून दोघांवरही गंभीर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. अपक्ष निवडून आलेल्या एका आमदारही मंत्री असून त्याच्यावरही गंभीर गुन्हा दाखल आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

भाजपचे सर्व मंत्री कोट्यधीश 
‘एडीआर’ने मंत्र्यांच्या संपत्तीचे विवरणही जाहीर केले आहे. मंत्रिमंडळातील २८ मंत्र्यांपैकी २६ मंत्री कोट्यधीश आहेत. भाजपचे सर्व म्हणजे १४ मंत्री कोट्यधीश असून ‘जेडीयू’च्या ११ पैकी नऊ मंत्री , ‘हम’ आणि ‘व्हीआयपी’चा प्रत्येकी एक आणि ‘जेडीयू’च्या कोट्यातील एक अपक्ष मंत्रीही धनाढ्य आहे. 

गंभीर गुन्हे असलेले मंत्री 
१४ - एकूण 
८  -भाजप 
३  -‘जेडीयू’ 
१ (प्रत्येकी)  ‘हम’ आणि ‘व्हीआयपी’ व अपक्ष 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा