बिहारमध्ये एनडीएचा फॉर्म्युला ठरला; भाजपला एवढ्या जागा

वृत्तसंस्था
रविवार, 23 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहार राज्यात जागावाटपावर आज (रविवार) एकमत झाले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) घटक पक्ष असलेला संयुक्त जनता दल (जेडीयू) 17, लोक जनशक्ती पक्ष (एलजेपी) 6 तर भाजप 17 जागांवर निवडणूक लढविणार आहे, याबाबतची माहिती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज दिली.

याबाबत अमित शहा यांनी आज सांगितले, की भाजप आणि जेडीयू 17 जागांवर निवडणूक लढविणार असून, रामविलास पासवान यांचा एलजेपी 6 जागांवर निवडणूक लढविणार आहे. तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी याबाबत सांगितले, की आमचा पक्ष लोकसभेच्या 17 जागांवर निवडणूक लढविणार आहे. याशिवाय राम मंदिर उभारणीचा प्रश्न न्यायालयाच्या निर्णयावरून सोडविण्यात येईल. 

दरम्यान, छत्तीसगड, राजस्थान आणि मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले होते. तसेच एनडीएतील घटक पक्ष असलेल्या चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षाने (टीडीपी) एनडीएतून बाहेर पडत त्यांच्या पक्षाने केंद्रीयमंत्रिपदाचाही राजीनामा दिला होता.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Bihar BJP JDU will contest 17 seats and LJP 6 seats