मजुरी करणाऱ्या बापानं आयफोन खरेदी करून दिला नाही, म्हणून संतापलेल्या 16 वर्षीय मुलानं घेतला गळफास; कुटुंबीयांच्या आक्रोशाने हळहळ
Bihar Minor Ends Life Over iPhone Demand : निखिल गेल्या काही दिवसांपासून आयफोन घेण्यासाठी सातत्याने आग्रह करत होता. परंतु, घराची आर्थिक परिस्थिती अत्यंत कठीण असल्याने त्याचे मजूर वडील त्याला आयफोन घेऊन देऊ शकले नाहीत.
Bihar Crime News : बिहारमधील खगरिया जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. मजुरी करणाऱ्या वडिलांना आयफोन (iPhone) खरेदी करून देता आला नाही, यामुळे एका अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.