
Bihar Bridge Built Without Road on Either Side 6 Crore Project Useless Authorities Order Probe
Esaka
पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत एक पूल बांधण्यात आलाय. त्या पुलासाठी एक दोन नव्हे तर तब्बल ६ कोटी खर्च करण्यात आले. पण धक्कादायक बाब म्हणजे हा पूल रस्त्याला मात्र जोडलेला नाही. त्यामुळे पूल नेमका बांधला कशासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे. बिहारच्या कटिहार जिल्ह्यातील डंडखोरा इथल्या महेशपूरमध्ये उभारण्यात आलेल्या या पुलाची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.