
Police investigating the murder of Reena Devi in Bihar’s Sidh village, allegedly killed by her husband Shyam Thakur due to his affair with his stepmother.
esakal
Summary
श्याम ठाकूरने पत्नीला फिरायला नेण्याच्या बहाण्याने निर्जन स्थळी नेले.
१० वर्षांच्या मुलगा शुभमने पोलिसांना घटनेची संपूर्ण माहिती दिली.
आरोपीला पोलिसांनी झारखंडमधील धनबाद रेल्वे स्टेशनवरून अटक केली.
एका व्यक्तीने आपल्या सावत्र आईशी असलेल्या प्रेमसंबंधातून पत्नीची गोळ्या घालून हत्या केली. मृत महिलेच्या १० वर्षांच्या मुलाने आपल्या वडिलांच्या कृत्याचे रहस्य पोलिसांना सांगितले. ही घटना मंगळवारी रात्री बिहारमधील अटारी पोलिस स्टेशन हद्दीतील सिध गावात घडली. मृताचे नाव ३० वर्षीय रीना देवी असे आहे. पोलिसांनी आरोपी पती श्याम ठाकूर याला झारखंडमधील धनबाद रेल्वे स्टेशनवरून अटक केली.