

Nandkishor Yadav From Bihar Invited To Royal Garden Party Celebrating His 25 Year Journey In International Culinary Arts
sakal
लंडन : बिहारच्या मातीचा अस्सल सुगंध, जादूई चव आणि २५ वर्षांची अथांग मेहनत... या त्रिवेणी संगमातून साकारलेल्या एका यशोगाथेची दखल थेट ब्रिटनच्या राजघराण्याला घ्यावी लागली आहे. बिहारच्या मोतिहारी गावातून सुरू झालेला शेफ नंदकिशोर यादव यांचा प्रवास आज स्कॉटलंडच्या ऐतिहासिक ‘पॅलेस ऑफ होलीरुड हाउस’च्या प्रांगणात जाऊन पोहोचला आहे.