ISI News : 'आयएसआय'च्या महिला एजंटने संरक्षण मंत्रालयातल्या क्लार्कला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं अन्...

ISI News
ISI Newsesakal

मुझफ्फरपूरः बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये एक धक्कादायक घटना उघड झाली आहे. आयएसआयच्या महिला एजंटने चक्क संरक्षण मंत्रालयातल्या एका लिपिकाला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. ही घटना आता उघड झाली असून पोलिसांनी सरकारी लिपिकाला ताब्यात घेतलं आहे.

मुझफ्फरनगरमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. एसएसपी जयंत कांत यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की, रवी चौरसिया याने अनेक गोपनिय कागदपत्रं आयएसआयला पाठवले आहेत. याच्या आधारावरच रवीला अटक केली.

ISI News
Pednekar-Somaiya Video : एकमेकांची डोकी फोडणाऱ्या कार्यकर्त्यांनो, हा व्हीडिओ बघाच!

रवी हा सुरुवातील चेन्नईमध्ये वाहन निर्मिती कारखान्यात पोस्टिंगवर होता. फेसबुकवर त्याची शानवी शर्मा नावाच्या तरुणीशी ओळख झाली. शानवीने त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं.

हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या रवीने पैशांच्या लालसेपोटी गोपनिय माहिती तिला पुरवली. सदर महिला आयएसआयची एजंट असल्याचं सांगितलं जात आहे. रवीला तिच्याबद्दल सत्यता समजल्यानंतरही त्यांनी माहिती पुरवणं सुरच ठेवलं. आज पोलिसांनी रवीला ताब्यात घेतलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com