‘एनडीए’ मध्ये घुसमट होतेय - जीतनराम मांझी

जीतनराम मांझी : बिहारचे मुख्यमंत्रिपद सोडल्याचा पश्चाताप
bihar cm Jitan Ram Manjhi statement NDA infiltrating nitish kumar Patna
bihar cm Jitan Ram Manjhi statement NDA infiltrating nitish kumar Patnasakal

पाटणा : भाजप नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) कनिष्ठ भागीदार म्हणून घुसमट होत असल्याची खंत बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी आज व्यक्त केली. बिहारच्या मुख्यमंत्रिपदावरून २०१५ मध्ये वर्षभरातच पायउतार झाल्याबद्दलही त्यांनी पश्चात्ताप व्यक्त केला. मांझी हिंदुस्थान आवाम मोर्चा या पक्षाचे संस्थापक असून बिहार विधानसभेत त्यांच्या पक्षाचे चार आमदार आहेत. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत भाजपच्या धोरणांवर टीका करण्यात आली. त्याचप्रमाणे, देशातील वाढत्या धार्मिक तणावावरही चिंता व्यक्त करण्यात आली.

बिहारमधील आगामी विधानपरिषद निवडणुकीत एनडीएतील ‘मोठ्या भागीदारांनी पाठिंब्याची विनंती केल्यावर आपण आपल्या पक्षाचे अस्तित्व जाणवून देऊ शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मांझी यांचे पुत्र संतोषकुमार सुमन सध्या बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळात असून तेच हिंदुस्थान आवाम मोर्चा या पक्षाचेही अध्यक्ष आहेत. दरम्यान, एनडीएतील नेत्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर जीतनराम मांझी यांच्या वक्तव्याची खिल्ली उडविली. त्यांनी सांगितले, की जीतनराम मांझी यांनी एनडीएवर आणखी एक आक्षेपार्ह आरोप केला असला तरी बिहारमधील सत्ताधारी एनडीए आघाडीकडून त्याला फारसे महत्त्व दिले जाणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.

राजकारणात १९८० पासून सक्रिय असलेल्या मांझी यांनी बिहारच्या अनेक मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केले. मात्र, नितीशकुमार यांनी २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीतील संयुक्त जनता दलाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यावर मांझी मुख्यमंत्री झाले होते. मात्र, त्यानंतर नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री बनले होते. बिहारमधील मद्यविक्रीपासून धर्मापर्यंतच्या विषयांवर आपली मते मांडणाऱ्या मांझी यांनी आपल्याला कधीही गांभीर्याने घेतली जात नसल्याची खंतही अनेकदा व्यक्त केली आहे.

‘नितीशकुमार पंतप्रधानपदाचे दावेदार’

भाजप बिहारमध्ये नितीशकुमार यांना कमकुवत करत आहे. नितीशकुमारांच्या जातीय सर्वेक्षणाच्या मागणीला भाजपकडून लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा बनविण्याचे प्रत्युत्तर दिले जाते. एकेकाळी भाजपचे दिग्गज नेते व बिहारचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी नितीशकुमार हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याचे म्हटले होते. आता, जीतनराम मांझी या भूमिकेत आले आहेत. एकीकडे भाजपकडून मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याकडे दुर्लक्ष केले जात असताना जीतनराम मांझी यांनी नितीशकुमार पंतप्रधानपदाचे दावेदार असल्याचे म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com