Nitish Kumar: शिक्षक भरतीत आता बिहारी फर्स्ट; मुख्यमंत्री नितीशकुमार यांची घोषणा; यंदापासून अंमलबजावणी
Teacher Recruitment: बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी शिक्षक भरती प्रक्रियेत डोमिसाईल धोरण लागू करण्याची घोषणा केली. या धोरणानुसार स्थानिक रहिवाशांना प्राधान्य मिळणार आहे.
पाटणा : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील शिक्षक भरती प्रक्रियेत अधिवास (डोमिसाईल) धोरण लागू करण्याची घोषणा बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सोमवारी केली.