esakal | नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळात जातीय समिकरणांची गोळाबेरीज; पाहा कोणा कोणाला दिली शपथ
sakal

बोलून बातमी शोधा

bihar cm nitish kumar oath

बिहारच्या राजभवनात झालेल्या कार्यक्रमामध्ये एकूण 15 जणांचा शपथविधी पार पडला. नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात जातीय समिकरणांची गोळाबेरीजही कऱण्यात आली आहे.

नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळात जातीय समिकरणांची गोळाबेरीज; पाहा कोणा कोणाला दिली शपथ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पाटणा - बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं आहे. सोमवारी सायंकाळी 4.30 च्या सुमारास राजभवनात शपथविधी सोहळा पार पडला. राज्यपाल फागू चौहान यांनी नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. नितीश कुमार यांच्यासोबत तारकिशोर प्रसाद आणि रेणु देवी यांनीही शपथ घेतली. दोघांनाही उप मुख्यमंत्री पदाची शपथ देण्यात आली आहे.

नितीश कुमार यांच्या शपथविधी सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपाध्यक्ष जेपी नड्डा, बिहार प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्यासह एनडीएचे नेते उपस्थित होते. नितीश यांच्यासोबत इतर मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. यामध्ये नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात जातीय समिकरणांची गोळाबेरीजही कऱण्यात आली आहे.

नीतीश कुमार यांच्या कॅबिनेतटमध्ये दरभंगा इथून विजय मिळवणाऱ्या जीवेश मिश्रा (ब्राह्मण), औराई मतदारसंघातील आमदार रामसूरत राय (यादव), राजनगर मतदारसंघातील आमदार राम प्रीत पासवान (दुसाध), आराचे आमदार अमरेंद्र प्रताप (क्षत्रिय), रेणु देवी (नोनिया), तारकिशोर प्रसाद (वाणी), विधानपरिषदेचे आमदार मंगल पांडे (ब्राह्मण) यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

बिहारच्या राजभवनात झालेल्या कार्यक्रमामध्ये एकूण 15 जणांचा शपथविधी पार पडला. यामध्ये नितीश कुमार यांच्यानंतर भाजपचे तारकिशोर प्रसाद, रेणु देवी यांनी शपथ घेतली. तर जदयूचे विजय चौधरी, विजेंद्र यादव, अशोक चौधरी, मेवालाल चौधरी, शीला कुमारी यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. यामध्ये शीला कुमारी यांनी पहिल्यांदाच मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

हे वाचा - नितीश कुमार यांचे अभिनंदन करताना तेजस्वींनी दिली सल्ला

याशिवाय भाजपच्या मंगल पांडे, अमरेंद्र प्रताप, रामप्रीत पासवान, जीवेश कुमार, रामसूरत राय यांनी तर हिंदुस्तानी आवाम मोर्चाच्या संतोष सुमन आणि विकासशील इंसान पार्टीच्या मुकेश सहानी यांनी शपथ घेतली.