VIDEO : छठ घाटांच्या पाहणीदरम्यान नितीशकुमार जखमी; पायाला-पोटाला गंभीर दुखापत, स्वत: सांगितला सगळा प्रकार

मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सुरक्षेतील त्रुटींच्या घटना सातत्यानं समोर येत आहेत.
Bihar CM Nitish Kumar Injured
Bihar CM Nitish Kumar Injuredesakal
Summary

मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सुरक्षेतील त्रुटींच्या घटना सातत्यानं समोर येत आहेत.

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Bihar CM Nitish Kumar) यांच्या सुरक्षेतील त्रुटींच्या घटना सातत्यानं समोर येत आहेत. तर, दुसरीकडं अनेकदा जबाबदार अधिकारी या घटनांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करताहेत. मात्र, आता खुद्द मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी याबाबत सर्व स्पष्ट केलंय. छठ घाटाच्या पाहणीदरम्यान झालेल्या दुखापतीबाबत त्यांनी माध्यमांना माहिती दिलीय.

छठ घाटांच्या (Chhath Ghat) पाहणीदरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार जखमी झाले आहेत. त्यांच्या पोटाला आणि पायाला गंभीर जखमा झाल्याचं त्यांनी स्वतः सांगितलं. नितीशकुमारांच्या पोटाला अजूनही मलमपट्टी आहे. यावेळी त्यांनी माध्यमांना आपला कुर्ता काढून जखमही दाखवली. डॉक्टरांनी (Doctor) जखमेची जागा सुरक्षित ठेवण्यास सांगितलं असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. या शिवाय त्यांनी मला कारच्या पुढच्या सीटवर बसता येत नाही, अशी माहितीही त्यांनी दिली.

Bihar CM Nitish Kumar Injured
नोटांवर गांधींसोबत लक्ष्मी-गणेशाचा फोटो असावा; केजरीवालांच्या मागणीवर भाजपचा पलटवार म्हणालं, मतांसाठी धर्माचं..

15 ऑक्टोबरलाही झाला होता अपघात

मुख्यमंत्री नितीश कुमार 15 ऑक्टोबरला पाटणाच्या गंगा घाटांची पाहणी करण्यासाठी बाहेर पडले होते. ते स्टीमरवर छठपूजेच्या व्यवस्थेचा आढावा घेत होते. या दरम्यान, त्यांचा अपघात झाला. या अपघातात मुख्यमंत्री गंभीर जखमी झाले आहेत. मात्र, अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना कोणतीही दुखापत झाली नसल्याचं स्पष्ट केलं होतं. दरम्यान, नितीशकुमार यांनी बुधवारीही पाटणाच्या गंगा घाटांची पाहणी केली. पाटी पूल घाटाचीही त्यांनी पाहणी केली. यादरम्यान मुख्यमंत्र्यांसोबतचा अपघात टळला आहे.

नितीशकुमार यांच्यावर वारंवार हल्ला

नितीश कुमारांच्या सुरक्षेतील त्रुटींची प्रकरणं सातत्यानं समोर येत आहेत. अलीकडंच, पाटणा जिल्ह्यातील बख्तियारपूरमध्ये एक व्यक्ती सुरक्षा घेरा ओलांडून नितीश कुमारांच्या अगदी जवळ पोहोचला होता. नितीशकुमार यांच्यावर हल्ला करणार तोच, आजूबाजूच्या लोकांनी त्याला पकडलं. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमादरम्यान स्टेजखाली फटाक्यांचा बॉम्ब फेकल्याची घटनाही घडलीय. काही दिवसांपूर्वी पाटण्याजवळ मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर संतप्त जमावानं हल्ला केला होता. मात्र, त्यावेळी नितीशकुमार ताफ्यात नव्हते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com