नोटांवर लक्ष्मी-गणेशाचा फोटो असावा; केजरीवालांच्या मागणीवर भाजपचा पलटवार, म्हटलं... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arvind Kejriwal vs Manoj Tiwari

भारतीय नोटांवर गांधीजींसोबत माता लक्ष्मी आणि गणेशाचा फोटो असायला हवा, अशी मागणी केजरीवालांनी केलीय.

नोटांवर लक्ष्मी-गणेशाचा फोटो असावा; केजरीवालांच्या मागणीवर भाजपचा पलटवार, म्हटलं...

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) यांनी आज (बुधवार) पत्रकार परिषदेत केंद्र सरकारला (Central Government) आवाहन करत भारतीय चलनावर (Indian Currency) गांधीजींसोबत माता लक्ष्मी आणि गणेशाचा फोटो असायला हवा, अशी मागणी केलीय.

यावर भाजप नेते मनोज तिवारी (BJP leader Manoj Tiwari) यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. केजरीवाल यांचं हे वक्तव्य हास्यास्पद असल्याचं सांगत त्यांनी मतांसाठी धर्माचा आव आणत असल्याचं म्हटलंय. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारला महत्त्वाचं आवाहन केलं. भारतीय नोटांवर गांधीजींसोबत माता लक्ष्मी आणि गणेशाचा फोटो असायला हवा, असं ते म्हणाले. यामुळं सुख-समृद्धी येईल आणि संपूर्ण देशाला त्याचा आशीर्वादही मिळेल. नव्या नोटांनी याची सुरुवात करता येईल, असंही त्यांनी म्हटलंय. यासाठी ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रही लिहिणार आहेत.

हेही वाचा: Rishi Sunak : 'ब्रिटनचा पंतप्रधान लवकरच भारतीय वंशाचा होईल'; 7 वर्षांपूर्वी 'या' व्यक्तीनं केलं होतं भाकीत

केजरीवाल पुढं म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था वाईट टप्प्यातून जात आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचं अवमूल्यन होत आहे. त्याचा परिणाम सर्वसामान्यांवर स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळं सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. भारत समृद्ध देश व्हावा, लोकांनी श्रीमंत व्हावं अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी अनेक पावलं उचलावी लागतील. आपल्याला रुग्णालये बांधावी लागतील, मोठ्या प्रमाणात शाळा उघडाव्या लागतील. पायाभूत सुविधा निर्माण कराव्या लागतील. यासाठी देवाचा आशीर्वाद असेल तेव्हाच आमचे प्रयत्न यशस्वी होतील, असंही केजरीवालांनी स्पष्ट केलंय.

हेही वाचा: Telangana : विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का; 'या' बड्या नेत्यानं दिला पक्षाचा राजीनामा