Congress Party Workers Clash : काँग्रेस कार्यालयात तुफान राडा, कार्यकर्ता रक्तबंबाळ, तर माजी आमदार गंभीर जखमी!

Congress office fight : जाणून घ्या, नेमकी कुठं घडली ही घटना; या घटनेमुळे काँग्रेसमधील अंतर्गत कलह समोर आला आहे.
Former MLA Ajay Singh injured during a violent clash among Congress workers at the Arrah party office in Bihar.
Former MLA Ajay Singh injured during a violent clash among Congress workers at the Arrah party office in Bihar. esakal
Updated on

Congress Clash Bihar : बिहारमधील आरा येथील काँग्रेस कार्यालयात तुफान राडा झाल्याचे समोर आले आहे. या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आपसांतच जोरदार हाणामारी झाली. ज्यामध्ये एक कार्यकर्ता अक्षरशा रक्तबंबाळ झाला तर एक माजी आमदार गंभीर जखमी झाले आहेत.

प्राप्त माहितीनुसार काँग्रेसचे बिहार प्रभारी सचिव आणि छत्तीसगडमधील भिलाईचे आमदार देवेंद्र प्रसाद यादव यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.  त्यादरम्यानच काँग्रेस कार्यकर्ते एकमेकांशी भिडले. परिस्थिती इतकी बिघडली की प्रचंड हाणामारी झाल्याचे दिसून आले. मात्र नेमका वाद कशामुळे उद्भवला हे अद्याप समोर आलेले नाही

याशिवाय या घटनेत काँग्रेसचे माजी आमदार अजय सिंह हे गंभीर जखमी झाले आहेत. कार्यकर्त्यांमधील हाणामारीचे फोटोही समोर आले आहेत, ज्यामध्ये ते एकमेकांशी हाणामारी करताना दिसत आहेत. तर कार्यक्रमस्थळी प्रचंड गोंधळ निर्माण झाल्याचेही स्पष्ट दिसते.

Former MLA Ajay Singh injured during a violent clash among Congress workers at the Arrah party office in Bihar.
Liquor Shop Viral Video : दारूसाठी तडफड! ; दुकानाच्या खिडकीच्या ग्रिलमध्येच अडकलं दारूड्याचं डोकं अन् मग...

कार्यकर्ते आपसात हाणामारी करत असताना, काहीजण त्यांना शांत करण्याचाही प्रयत्न करत होते, परंतु याचा फारसा फायदा झाला नसल्याचे दिसले. आपसात भांडणारे एकमेकांचे कपडेही ओढत होते. या हाणामारीत माजी आमदार अजय सिंह यांच्या गटातील एका कार्यकर्त्याचं डोकंही फुटलं अन् त्याच्या डोक्यातून प्रचंड रक्तस्त्राव झाला.

Former MLA Ajay Singh injured during a violent clash among Congress workers at the Arrah party office in Bihar.
Donald Trump Tariff Announcement : डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी सहा देशांवर फोडला टेरिफ बॉम्ब; जाणून घ्या, आता कुणाचा नंबर लागला?

काँग्रेस कार्यालयात घडलेल्या या घटनेने पक्षातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. आता या घटनेवर पक्षाचे वरिष्ठ नेते कशाप्रकारे कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. शिवाय, यामुळे काँग्रेसबाबतही सर्वसमान्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com