Video : काँग्रेस आमदाराचा बेडरुममधील व्हिडिओ व्हायरल

वृत्तसंस्था
Wednesday, 4 September 2019

बिहारमधील एका आमदाराचा पत्नीसोबतचा बेडरुमधील खासगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पाटणाः बिहारमधील एका आमदाराचा पत्नीसोबतचा बेडरुमधील खासगी टिकटॉक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विरोधकांनी पत्नीचा मोबाईल हॅक करून बदनामी केली आहे, असा आरोप आमदार सुधीर कुमार उर्फ बंटी चौधरी यांनी केला आहे.

सुधीर कुमार यांनी आपल्या पत्नीसोबत बेडरुममध्ये टिकटॉक व्हिडिओ तयार केला होता. मात्र, अज्ञात व्यक्तीने पत्नीचा मोबाईल हॅक करून संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. संबंधित व्हिडिओ हा आमचा खासगी होता. मात्र, मला बदनाम करण्यासाठी हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. विरोधकांचा हा डाव आहे, असा आरोप सुधीर कुमार यांनी केला आहे.

सुधीर कुमार यांनी व्हिडिओ व्हायरल केल्याबद्दल तक्रार दाखल केली असून, पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन चौकशी करण्याची मागणी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bihar congress mla private tiktok video viral with wife