esakal | Bihar election 2020 : काँग्रेसला वेध सत्तास्थापनेचे
sakal

बोलून बातमी शोधा

congress

काँग्रेसमध्ये पुढील रणनितीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. पक्षाध्यक्षा सोनिया गांधींनी बिहारसाठी सरचिटणीस रणदीप सुरजेवाला आणि अविनाश पांडे यांची निरीक्षकपदी नियुक्ती केली आहे.

Bihar election 2020 : काँग्रेसला वेध सत्तास्थापनेचे

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणूकीच्या मतदानोत्तर कल चाचणीतून नितीशकुमार सरकारच्या गच्छंतीची चाहूल लागल्याने काँग्रेसमध्ये पुढील रणनितीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. पक्षाध्यक्षा सोनिया गांधींनी बिहारसाठी सरचिटणीस रणदीप सुरजेवाला आणि अविनाश पांडे यांची निरीक्षकपदी नियुक्ती केली आहे.

बिहारमध्ये काल मतदान पूर्ण झाले असून मंगळवारी (ता. १०) मतमोजणी होणार आहे. कालच्या मतदानोत्तर कलचाचणीतून राजद-काँग्रेसच्या महाआघाडीचे सरकार स्थापन होऊ शकेल, असे संकेत मिळाल्याने काँग्रेस नेतृत्वाचा उत्साह वाढला आहे. बिहारमध्ये पक्षविस्ताराच्या संधीसाठी सत्तेत मानाची भागीदारी आवश्यक असल्याने पुढील तयारीसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यातूनच निरीक्षक नेमण्याचा निर्णय झाला आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

निवडणूकीदरम्यान बिहारमध्ये ठाण मांडून राहिलेले सरचिटणीस आणि माध्यमविभाग प्रमुख सुरजेवाला आणि उमेदवार छाननी समितीचे प्रमुख असलेले माजी सरचिटणीस अविनाश पांडे यांच्याकडेच निरीक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

एरव्ही निकालानंतर विधीमंडळ पक्षनेता निवडीसाठी नवनिर्वाचित आमदारांचा कल जाणून घेण्यासाठी दिल्लीतून निरीक्षक पाठवण्याची परंपरा राहिली असली तरी आताची परिस्थिती वेगळी असल्याचे काँग्रेस सूत्रांचे म्हणणे आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप