Mukesh Sahani
esakal
Bihar Assembly Election : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महागठबंधनने आपल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारांची घोषणा केली आहे. या घोषणेत विकासशील इन्सान पक्षाचे (VIP) प्रमुख मुकेश साहनी यांना उपमुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं आहे. परंतु, हा निर्णय घेताना महाआघाडीने काँग्रेससारख्या मोठ्या सहयोगी पक्षाला वगळून साहनींवर विश्वास का ठेवला, हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.