
RJD Manifesto: देशभरात सध्या बिहार निवडणुकीची चर्चा आहे. त्यातच आरजेडीच्या जाहीरनाम्याकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहेत. तेजस्वी यादव यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत आपले संकल्प जाहीर केले. बिहारमध्ये मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे. त्यामुळे राज्यात आरजेडीचं सरकार आलं तर त्यावर गंभीर उपाय शोधू, असं आश्वासन यादव यांनी दिलं.