

prashant kishor
esakal
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाची प्रक्रिया सुरू झाली असताना, जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. निवडणूक रणनीतीकार म्हणून ओळखले जाणारे प्रशांत किशोर यांची राजकीय कारकीर्द सुरू होताच संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यांच्या दाव्यांनुसार, जर जेडीयूने २५ जागा जिंकल्या तर ते राजकारणातून निवृत्त होतील, असे त्यांनी माध्यमांना सांगितले होते. आता निवडणूक आयोगाच्या ट्रेंडनुसार जनसुराजचा एकही उमेदवार आघाडीवर नसल्याने, सोशल मीडियावर त्यांच्या सन्यासाबाबत जोरदार चर्चा आणि ट्रोलिंग सुरू आहे.