Bihar Election Result

बिहार विधानसभेसाठी नुकतंच मतदान पार पडलं आहे. या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. आज सकाळी ७ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. काही तासांतच निकालाचं चित्र स्पष्ट होणार असून बिहारमध्ये एनडीए आणि ‘महागठबंधन’ यांच्यातील थेट लढतीत कोण बाजी मारणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. या निवडणुकीत विकास, बेरोजगारी, जातीय समीकरणं आणि महागाई हे मुद्दे ठळकपणे समोर आले. मुख्यमंत्री पदासाठी नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांची नावं चर्चेत आहे. विशेष म्हणजे यंदा बिहारमध्ये रेकॉर्ड ब्रेक मतदान झाल्याचं बघायला मिळालं आहे. त्यामुळे सगळ्यांचीच धाकधूक वाढली आहे. अशावेळी मतदार कुणाच्या बाजुने कौल देणार? हे अवघ्या काही तासांत स्पष्ट होणार आहे. बिहार विधानसभेत एकूण २४३ जागा असून बहुमतासाठी १२२ जागा जिंकाव्या लागणार आहेत. आजच्या निकालावर बिहारचं राजकीय भविष्य ठरणार आहे आणि पुढील पाच वर्षांच्या सत्तासमीकरणाची दिशा निश्चित होणार आहे. सर्व राजकीय पक्षांनीही मतमोजणी केंद्राबाहेर तळ ठोकला आहे.
Marathi News Esakal
www.esakal.com