esakal | बिहार - भाजपने सुशील कुमार मोदींना राज्यसभेची उमेदवारी देऊन केली डबल गेम
sakal

बोलून बातमी शोधा

sushil kumar modi

रामविलास पासवान यांच्या निधनानंतर बिहारमध्ये राज्यसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना निवडणूक आयोगाने जारी केली आहे. 

बिहार - भाजपने सुशील कुमार मोदींना राज्यसभेची उमेदवारी देऊन केली डबल गेम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पाटणा - बिहारमध्ये पुन्हा एकदा नितिश कुमार यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं. मात्र यामध्ये उपमुख्यमंत्री पदावरून सुशील कुमार मोदी यांना हटवण्यात आल्याने वेगळीच चर्चा रंगली होती. पण भाजपने सुशील कुमार मोदी यांना राज्यातून केंद्रात बढती दिली असून त्यांच्या नावाची घोषणा राज्यसभेसाठी केली आहे. भाजपने सुशील कुमार मोदी यांची राज्यसभा उमेदवार म्हणून घोषणा करत एकाच दगडात दोन पक्षी मारले आहेत. 

लोक जनशक्ती पक्षाचे रामविलास पासवान यांच्या निधनानंतर राज्यसभेची एक जागा रिक्त झाली होती. दरम्यान, बिहारच्या विधानसभा निवडणुकीत राम विलास पासवान यांचे चिरंजीव चिराग पासवान यांनी एनडीएतून बाहेर पडत वेगळी चूल मांडली. त्यामुळेच भाजपने लोजपला बाजूला टाकल्याचं म्हटलं जात आहे. अन्यथा ही जागा लोजपला मिलाली असती. आता भाजपने सुशील कुमार मोदी यांच्या नावाची घोषणा केल्यानं नाराजी दूर झाली तर चिराग पासवान यांना दणका बसला आहे. 

हे वाचा - भारत आर्थिक मंदीच्या दिशेनं; दुसऱ्या तिमाहीत जीडीपी -7.5 टक्क्यांवर

रामविलास पासवान यांच्या निधनानंतर बिहारमध्ये राज्यसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना निवडणूक आयोगाने जारी केली आहे. तसंच अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाला आहे. पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झालेला नाही. मात्र भाजपने सुशील कुमार मोदींना त्यांचा उमेदवार घोषित केलं आहे. 

निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार, तीन डिसेंबरला अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. तर 28, 29, 30 नोव्हेंबरला एनआय अॅक्ट अंतर्गत सुट्टी असल्यानं त्या दिवशी अर्ज दाखल करून घेतले जाणार नाहीत. या जागेसाठी 14 डिसेंबरला मतदान असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया 16 डिसेंबरला संपणार आहे. 

loading image