esakal | Bihar Election: आता 'लालटेन' नाही, मोदींच्या LEDने होणार बिहारचा विकास- जेपी नड्डा
sakal

बोलून बातमी शोधा

jp nadda

बिहार विधानसभा निवडणूक प्रचाराचा जोर चांगलाच वाढला आहे. पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवार आरोप-प्रत्यारोपाची एकही संधी सोडलेली नाही.

Bihar Election: आता 'लालटेन' नाही, मोदींच्या LEDने होणार बिहारचा विकास- जेपी नड्डा

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

पाटणा- बिहार विधानसभा निवडणूक प्रचाराचा जोर चांगलाच वाढला आहे. पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवार आरोप-प्रत्यारोपाची एकही संधी सोडलेली नाही. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी एका सभेत बोलताना आरजेडीवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. तेजस्वी यादव यांच्या पोस्टरवर लालू प्रसाद यादव यांना दाखवले जात नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना इतके जागृत केले आहे की मुलगा आपल्या वडिलांचा फोटोही पोस्टरवर लावत नाही. तेजस्वी यांना माहिती आहे की, लालू यांचा फोटो लावला, तर लोकांना 'लालटेन युगा'ची आठवण होईल आणि जेव्हा जेपी मोंदीच्या फोटोबद्दल बोलतील तेव्हा 'एलईडी युग' लक्षात येईल, अशी टीका त्यांनी केली आहे. 

निरोगी लोकांच्या शरीरात सोडले जाणार कोरोना विषाणू; ब्रिटनची घोषणा

2014 पूर्वी कोणीही रिपोर्टकार्ड ठेवत नव्हते. 2014 पूर्वी लोक म्हणायचे मी या जातीचा आहे, त्या जातीचा आहे, मी मागास जातीचा आहे. लोक जातीच्या आधारावार  मत मागायचे. 2014 नंतर मोदींनी राजनितीचे चरित्र बदलले आहे. आता कोणीही आलं तर त्याला विकासाबाबत बोलावे लागेल. तेजस्वी यादव यांनाही याची जाणीव झाल्याचे दिसते त्यामुळेच त्यांनी पोस्टरवर आपल्या वडिलांच्या फोटोला स्थान दिलेले नाही, असा टोला नड्डा यांनी लगावला. 

बिहारमध्ये 60 वर्षापर्यंत केवळ एकच मेडिकल कॉलेज होते. त्यांनतर तीन खाजगी मेडिकल कॉलेज सुरु करण्यात आले. पण, मोदी सरकार आल्यानंतर 11 मेडिकल कॉलेज सुरु करण्यात आले. बिहारमध्ये आता 14 मेडिकल कॉलेज आहेत. मोदींच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 11.23 कोटी घर बांधण्यात आलेत, तर बिहारमध्ये 1 कोटी 28 लाख बांधून महिलांना सन्मान देण्यात आला आहे. शेतकऱ्यांची काळजी कोणी केली असेल तर ती फक्त नरेंद्र मोदींनी, असंही नड्डा म्हणाले. 

स्वामीनाथन आयोग लागू करुन उत्पादन किंमतीच्या दीड पट MSP  देण्याचे काम मोदींनी केले आहे. राजकारण एक गंभीर विषय आहे. भाजप, VIP आणि जेडीयूला मत द्या, जर पंतप्रधान मोदी केंद्रात राहतील आणि नितीश कुमार राज्यात राहतील, तर बिहारचा विकास होईल. आरजेडी म्हणते तरुणांना रोजगार देऊ, पण खऱ्या अर्थाने मोदींनी तरुणांना रोजगार देण्याचे काम केले असल्याचे ते म्हणाले आहेत. 

bihar election बिहार निवडणूक