esakal | निरोगी लोकांच्या शरीरात सोडले जाणार कोरोना विषाणू; ब्रिटनची घोषणा
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus_Patient_

ब्रिटिश संशोधकांनी कोविड-19 लशीच्या (Covid-19 Vaccine) शोधासाठी निरोगी असणाऱ्या तरुणांच्या शरीरात कोरोना विषाणू सोडण्याची तयारी केली आहे.

निरोगी लोकांच्या शरीरात सोडले जाणार कोरोना विषाणू; ब्रिटनची घोषणा

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

लंडन- ब्रिटिश संशोधकांनी कोविड-19 लशीच्या (Covid-19 Vaccine) शोधासाठी निरोगी असणाऱ्या तरुणांच्या शरीरात कोरोना विषाणू सोडण्याची तयारी केली आहे. त्यामुळे आजाराबाबात संशोधन आणि लस विकासाच्या कामात वेग येण्यासाठी वादग्रस्त पर्यायाची घोषणा करणारा करणारा ब्रिटन पहला देश ठरला आहे. अशा प्रकारच्या पर्यायाचा वापर करणे आव्हानपूर्ण मानलं जातं. तसेच याचा वापर खूप कमी वेळा केला गेलाय. निरोगी लोकांना संक्रमित करणे अनैतिक मानलं जातं. 

कोरोना विषाणूला रोखण्याच्या दिशेने काम करणाऱ्या संधोनकांच्या म्हणण्यानुसार, अशाप्रकारच्या प्रयोगामुळे लवकरात लवकर लशीची ओळख करणे शक्य होते. संशोधनकर्ता प्रोफेसर पीटर ओपनशॉ यांनी सांगितलं की, संशोधनात सहभागी स्वंयसेवकांना कोरोनाचे संक्रमण करणे हलक्यात घेतले जाऊ शकत नाही. पण, अशा प्रकारच्या संशोधनामुळे विषाणूबद्दल विस्ताराने माहिती मिळू शकते. 

भाजपकडून घोषणा : एकनाथ खडसेंचा राजीनामा, मात्र देवेंद्र फडणवीस म्हणतात मला...

लंडन इम्पिरियल कॉलेजने सांगितले की, 18 ते 30 वर्षांच्या स्वंयसेवकांवर हे परिक्षण केले जाईल. दुसरीकडे ब्रिटनमध्ये कोरोनावरील प्रभावी लस लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे. आरोग्य अधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार पुढील वर्षाच्या सुरुवातीपासून कोरोनावरील लशीचा वापर सुरु होऊ शकतो. 

ऑक्सफर्ड यूनिव्हर्सिटीची अस्ट्राजेनेकाद्वारे बनवली जाणारी कोविड लस डिसेंबरनंतर वापरासाठी मिळू शकते, अशी माहिती इंग्लडचे आरोग्य अधिकारी आणि कोरोना महामारीसंबंधी सरकारचे सल्लागार जोनाथन वान यांनी दिली आहे. भारतात ऑक्सफर्ड यूनिव्हर्सिटीने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियासोबत करार केला आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या लशीच्या तिसऱ्या टप्पातील चाचणी पार पडत आहे. या परिक्षणाबाबतची सखोल माहिती नोव्हेंबरपर्यत मिळेल, असं सांगितलं जात आहे. 

दरम्यान, जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहेत. आतापर्यंत 4 कोटींपेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, 11 लाखांपेक्षा अधिकांनी आपला जीव गमावला आहे. अशा परिस्थितीत कोरोनावर प्रभावी ठरणारे औषध आणि लस तयार करण्यासाठी वैज्ञानिक दिवसरात्र प्रयत्न करत आहेत. लस लवकर मिळावी यासाठी विविध पर्यांयाचा विचार केला जात आहे. 
 

loading image