
Bihar Election
esakal
बिहार विधानसभा निवडणूक 2025 हळूहळू रंगतदार होत आहे. प्रसिद्ध मैथिली गायिका मैथिली ठाकूर यांनी अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केला आणि आता त्यांना अलीनगर मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे. बुधवारी जाहीर झालेल्या भाजपच्या दुसऱ्या यादीत मैथिली ठाकूर यांचे नाव समाविष्ट आहे. त्यांच्या जादुई आवाजाने लाखो चाहत्यांची मने जिंकली असली, तरी राजकीय रणभूमीवर मतदारांचे मन जिंकणे त्यांच्यासाठी सोपे नसेल. अलीनगरमधील राजकीय आणि सामाजिक समीकरणे त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे करत आहेत.