
पाटणाः बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) रविवारी जागावाटप निश्चित झाल्यानंतर एनडीएमध्ये नाराजी नाट्य रंगले आहे. केंद्रीय मंत्री जितनराम मांझी यांच्या हिदुस्तानी आवामी मोर्चाला आणि राज्यसभेचे खासदार उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोक मोर्चाला प्रत्येकी सहा जागा देण्यात आल्या आहेत. अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्याने या दोन्ही पक्षांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली.