कोरोनामुळे निवडणुका थांबवता येणार नाहीत;बिहार निवडणुकीबाबत याचिका फेटाळली

पीटीआय
Saturday, 29 August 2020

निवडणूक थांबविण्याची सूचना निवडणूक आयोगाला आम्ही कशी करू शकतो. निवडणूक पुढे ढकलण्यासाठी कोरोनाचे कारण वैध ठरणार नाही. यावर निवडणूक आयोगच सर्व गोष्टी ठरवेल, असे न्यायालयाने सांगितले.

नवी दिल्ली - ‘कोरोनाच्या कारणावरून निवडणुका पुढे ढकलता येणार नाहीत,’ असे स्पष्ट करीत बिहारमधील विधानसभा निवडणूक पुढे ढकलण्यासंबंधीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बिहार कोरोनामुक्त होईपर्यंत निवडणूक पुढे ढकलण्याच्या मागणीसाठी अविनाश ठाकूर यांनी जनहित याचिका दाखल केली आहे.  न्यायाधीश अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील न्या. आर. एस. रेड्डी आणि न्या. एम. आर. शहा यांच्या खंडपीठात त्यावर आज सुनावणी झाली. बिहारमधील विधानसभा निवडणुकीसाठी अद्याप अधिसूचना निघाली नसल्याने ही याचिका वेळेआधीच केलेली आहे. निवडणूक थांबविण्याची सूचना निवडणूक आयोगाला आम्ही कशी करू शकतो. निवडणूक पुढे ढकलण्यासाठी कोरोनाचे कारण वैध ठरणार नाही. यावर निवडणूक आयोगच सर्व गोष्टी ठरवेल, असे न्यायालयाने सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bihar election petition rejected